Monday, 1 March 2010

॥ मी चित्तपावन ॥


मी शुद्ध चित्पावन कोंकणस्थ ब्राम्हण

गोरा नाही, घारा नाही म्हणून बेरकीही नाही

वर्णव्यवस्थेचा पुरस्कर्ता तर नाहीच नाही

म्हणुन म्हणतो आपल्यातला म्हणुन समजु नका

मिसरुड फुटण्याआतच आंबेडकर वाचुन ढसाढसा रडलो

आक्रंदलो, संतापलो आणि संस्कृतीवर यथेच्छ थुंकलो

त्याचवेळी खरा मी चित्तपावन झालो

क्रांतीशिखेच्या तप्त ज्वालेत जानव जाळल

बुद्धाला गळ्यात वागवल

तरीही मी ब्राम्हणच ठरलो

मात्र एक मराठ्यन `धेडपट' म्हणताच

तळपायाची भिरभिरत मस्तकात घुसली

`धेड' असतो तर भडव्याची नरडीच घोटली असती.

तरीही मी थंडच होतो कारण मी भुदेव होतो

काहीही न करणारेच फक्त अंतर्मुख होतात

पण या षंढ संस्कृतीन मलाही षंढच बनवल

म्हणुनच फुक्कटच्या फाकट अंतर्मुख झालो

षंढ असल्यावर अंतर्मुख होणे केंव्हाही चांगले

माटेमास्तरांची याद उसळुन वर आली

म्हणुनच `महाराच' बिरुद मी मानान वागवल

तेच म्हणुन घरच्यांनीही हिणवल-शिणवल तेव्हा

तेंव्हा मात्र खरोखरीच मी महार झालो

आगलावी आक्रस्तळेपणा होता म्हणुन मीं ढसाळ ही बनलो

आणि संस्कृतीला सणसणीत लगाऊन क्रांतीदुतही झालो

तरीही मी थंडच होतो कारण मी भुदेव होतो

रानडे, आगरकर, माटे सावरक माझे

म्हणुनही मी खुष झालो

आणि `आंबेडकरी तत्त्वज्ञान' घेऊन मोकाट सुटलो

नव्या जातभाईन `तुही जात कंची', अस विचारताच

मी पुरता निखळलो, तुटलो आणि सुन्न झालो

तरीही मी थंडच होतो कारण मी भुदेव होतो


मुकुंद शिंत्रे

संकलन:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....