
अलीकडे तिच्या वाटेत देशी विदेशी राजहंस असतात
आम्ही आधीचेच झालेलो धुरकट जिथं रंगबेरंगी
फुग्यांसाठी जीव तोडून रडायचं
अभयारण्य
थोडी पत गाठीला बांधून ऐकायचं तिच्या संबंधातलं
रेडीओबूत जे सकृतदर्शनी शुक्लांगी
जिथं रुततं निवडुंगासह दोन फण्यांतील विषुववृत्त
नि उतरतात कालाबूतीनं गळे पद्मपाणी
जिथं घोड्याच्या घोडवळीला तडफडतात
पाणघोडे पाण्याशिवाय
नि विकारतात पददलित झोळ्या भोकांडून
जिथं ऑगस्ट-सप्टेंबरातला गुलमोहर
त्याच्याकडे पाठ फिरवून तिचं बांधेसूद शरीर
राजहंसाच्या शय्येसोबत
शिशमहल
ज्याचे काटे
आमच्या डोळ्यात माखलेले
नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment