
सखये सखये म्हणत राहिलो लिहित राहिलो सखये
गजलेच्या आरशात तुजला बघत राहिलो सखये
आठवणीचा तुझ्या काफिला माझ्या सोबत होता
त्याच्या संगे कुठे कुठे मी फिरत राहिलो सखये
तुझ्या कल्पना विचार कलिका बाग बगीचा बहरे
बागडणारी फुलपाखरे धरत राहिलो सखये
मौल्यवान जडजवहीरासम स्वप्ने खजिना माझा
मी मौल्यवान ही हृद्यतिजोरी भरत राहिलो सखये
कधी तरी येशील परतुनी 'इलाही'स भेटाया
तुझ्याचसाठी रात्रंदिन मी झुरत राहिलो सखये
इलाही जमादार
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment