
येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो
म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून भागत नाही रे
पण पापणीलाच केस नसतो
आणि बुबुळांच्या काचा झालेल्या असतात रे
येथला प्रत्येक पिवविता कंजूषच असतो
म्हणून नुसते प्यालेच फोडून चालत नाही रे
इथे आतून पेटलेलाच आत्मा नसतो
आणि सृजनांचे कोळसे झालेले असतात रे
येथला प्रत्येक महाकवी आखूडच असतो
म्हणून शब्दांच्याच नजाकतीला भुलणं शोभत नाही रे
इथे माणसालाच माणूस खात असतो
आणि वाल्याच्या पाठीवरले वळ लपविले जातात रे
नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment