Showing posts with label quiet time in Kripa. Show all posts
Showing posts with label quiet time in Kripa. Show all posts

Thursday, 23 December 2010

08/10/2010

आज आकाश कंदील बनवण्याच्या कारणास्तव आउटपूट झाले नाही, त्यामुळे सेल्व्ज बद्दल काही विचारायचे होते, ते राहून गेले. कारण जे पाच प्रायमरी सेल्व्ज आहेत ते लहानपणापासूनचे वर्तन ध्यानात घेता कमी अधिक प्रमाणात माझ्यात आहेत. पण कांही कांही संदर्भातच. कारण एक पुस्तक वाचत होते, ;मनोविकाराचा मागोवा' तर त्यात उल्लेख केलेले फोबिया, मनिया, मंत्रचळ, स्किझोफ्रेनिया, मद्यपाश! इ.इ. सर्व मला स्वतःला झाल्याचे अथवा त्यांची लक्षणे असल्याचा भास होतो! तर तेंव्हापासून तसले काही वाचतच नाही!!
इतक्या कमी वेळात सेल्फ बद्दल लिहिणे संभव नाही. म्हणून दुर्लक्ष देखील करत नाही.
काही किरकोळ प्रसंगात निकष लावून आपण स्वतःला अमुक एका सेल्ववर काम करायचे असे किरकोळीतच ठरवावे लागते!
किरकोळ उदाहरणच घ्यायचे झाले तर, समजा मी भिडस्त स्वभावाचा, म्हणजे प्लीजर आहे, तर मी जेंव्हा वारकाकडे कटिंग करायला जातो, तेंव्हा वास्तविक मला साधी कटिंग अपेक्षित असते..आणि तो न्हावी सांगतो, की तुम्हाला अमुक एक 'कट' चांगला दिसेल, तेंव्हा मी त्याला उगाच वाईट वाटेल, म्हणून त्याच्या मनाप्रमाणे करतो. मात्र नंतर त्याला मी शिव्या देऊ लागतो (अर्थात मनातल्या मनात) आणि वरवर मात्र चांगली केली असे म्हणतो, वास्तविक ती कट अतिशय छपरी अशा प्रकारची असते!

Wednesday, 22 December 2010

06/10/2010

एक वीस-बावीस वर्षाची  तरुणी. तिचे एका तरुणावर प्रेम. हा तरुण कमी शिकलेला,  बेरोजगार. त्या मुलीचे वडील त्याला घरी बोलावतात. पण अपमान करून घालवतात. तो जातो.
त्यानंतर एक पावसाळी रात्र. ती मुलगी त्या रात्री पावसात नावेने नदी ओलांडून त्या मुलाकडे जाते. नावाडी मुलीच्या निरुपायाचा फायदा घेऊन तिच्याकडून अंगठी, चैन घेतो..मात्र तिला पैलतीरी पोचवतो.
ती मुलगी त्या मुलाकडे येते. मात्र..तो तिला नाकारतो आणि येथून निघून जा असे सांगतो.
त्याचवेळी तिथे एक दुसरा मुलगा उपस्थित होतो. तो तिला सांगतो, की त्याचे तिच्यावर खूप-खूप प्रेम आहे..मात्र ती दुस-याशीच प्रेम करत असल्याने आणि हे त्याला ठावूक असल्याने तो काही बोलला नव्हता. तेंव्हा आता तू माझ्याशी लग्न करशील का? असे तो दुसरा मुलगा विचारतो.
यावर ती मुलगी चटकन तयार होते. आणि ती मुलगी त्या दुस-या मुलाशी लग्न करते. 
हि झाली आजची रेणूताई गावसकर यांची कथा. त्यांनी हि कथा सांगितल्या नंतर त्या कथेतील पाच पात्रांच्या भूमिकेत जाण्यास सांगितले. तेंव्हा त्यांचे मूल्यमापन न करता ते त्यांच्या भूमिकेत साजेशे वागले असे थोडक्यात म्हणू शकतो. कारण कोणताही बाप आपल्या मुलीला बेरोजगार वगैरे माणसाच्या पदरी बांधणार नाही. तिथे ते बापाचे प्रेमच असते. त्याने प्रथम मुलीला रागावयास हवे हे म्हणणे ठीक आहे, मात्र जसे इतरत्र ते घडते तसे इथे घडले नाही, इतकेच.
दुसरा मुद्दा म्हणजे तो नावाडी. तो प्रसंगानुरूप वागला म्हणावा लागेल कारण जरी त्याने अंगठी, हार वगैरे घेतला तरी दुसरा गैरफायदा घेतला नाही हि सुदैवाने चांगलीच बाजू.
आता ज्या मुलावर 'त्या' मुलीचे प्रेम होते तो असा का वागला? तर कदाचित प्रेमापेक्षा त्याला आपला 'इगो' महत्वाचा वाटला असेल. तो इथल्या भाषेत स्वतःपेक्षा 'द अदर्स' ला महत्व देत असावा. 
दुसरा मुलगा संधिसाधू जरी वाटला तरी त्याने पहिल्याने त्या मुलीला नाकारेपावेतो कुठेही मध्ये लुडबूड केली नव्हती.
मुलीला जेंव्हा त्याने हे सांगितले की त्याला तिच्याविषयी प्रीती वाटते, आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छितो, तेंव्हा मुलीकडे बापाकडे वापस येण्याचा अथवा स्वतःचे आयुष्य एकटे, नव्याने सुरवात करण्याचा आणि लग्नास 'नाही' म्हणण्याचा देखील पर्याय होता.
मात्र...मात्र असे कोणतेही पर्याय न निवडता, तिने 'त्या' दुस-या मुलाशीच की, ज्याच्याविषयी तिला काडीमात्र माहिती नाही, अशा अनोळखी मुलाशीच लग्नाचा का निर्णय घेतला? हा कळीचा मुद्दा आणि मुलगी कथेची केंद्रबिंदू असल्याने महत्वाचा आहे. 
तिने दुस-या मुलाशी लग्न करणे हा पर्याय निवडताना नाकारण्याचा (पहिल्याने) हा एक भाग असू शकेल किंवा दुसरा कुणी माझ्यासाठी जीव टाकायला तयार आहे, हि तात्कालिक पण सुखावणारी सुखद मात्र क्षणिक भावना आहे.
या विषयावर 'आदर्श' काय असायला हवे होते?
प्रत्येकाचा दृष्टीकोन कसा हवा होता?
आणि आवश्यक जरी नसले तरी चूक/बरोबर काय?
याविषयी एखाद्या कादंबरी इतका लेख तयार होऊ शकतो. पण आज तो विषय नाही आणि हे स्थळ देखील नाही.
'त्या मुलीच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते?' या उत्तरादाखल मी हात वर देखील केला मात्र, नेहमीप्रमाणे माझ्या 'मुखदौर्बल्याने' उत्तर दिले नाही.(दारू पिल्यानंतर हे
'मुखदौर्बल्य' कोठे जाते कुणास ठावूक!) पण त्यामागे empathize  करताना मी 'स्त्रीमन' 'तिच्या भावना' 'तिची त्याक्षणीची मन:स्थिती' इ.इ.गोष्टींचा उगाच भाकड तर्काने,  अनुमानाने अंदाज न बांधता, फक्त 'ती' म्हणजे 'मी' असे ठरवूनच निर्णय घेईन आणि तो निर्णय नक्कीच असेल की त्या 'दुस-या मुलाशी लग्न करण्याचा!
याचे सबळ कारण मला ती नाकारण्याची भावना (feeling of rejection) इतकी तीव्र आणि जिव्हारी लागेल की, मी केवळ पहिल्याचा सूड म्हणून देखील की, 'बघ, तू नाहीस तर, माझ्यावर मारणारे अजून कितीतरी आहेत..!' म्हणून मग तो दुसरा दारुडा असू देत किंवा जुगारी असू देत किंवा चोर, खुनी असू देत!
मी त्या पहिल्याला धडा शिकवणे किंवा त्याला पश्चाताप व्हावा म्हणून मुद्दाम लग्न करेन!
वास्तविक ret ची परिभाषा येथे लावता येते.
१.महत्वाच्या व्यक्तीच्या प्रेमाव्यतिरिक्त देखील आपण स्वतंत्र व्यक्तिमत्वाने जगू शकतो.
२ सर्वांनाच धडा शिकवणे आपले काम नाही.
३ स्वहित प्रथम जपले पाहिजे.  इ. इ.
मात्र इथे सर्व विवेकी कल्पनावर अविवेकी कल्पना मात करतील.
त्यामुळे मी अद्याप पुरेसा विचार करू शकत नाही त्यामुळे विवेकी अथवा अविवेकी असे सदा सर्वदा काही नसते याचे भान धरून देखील मी वारंवार स्लीप होते हे प्रमाण मानले तर,
मी त्या दुस-या मुलाशी ताबडतोब लग्न करेन हे निश्चित!
शेवटी जाता जाता त्याचा एक असाही शेवट मनात आलाच की, 
ती मुलगी दुस-याशी लग्न करते. पहिला मुलगा नंतर पश्चातापाने दग्ध होतो आणि दारूच्या आहारी जातो. मुलीला नंतर आपली चूक समजते आणि तिच्या मनात आता लग्नानंतर पहिल्याचेच विचार सुरु होतात. त्यामुळे दोघांत वारंवार खटके उडतात...त्याला कंटाळून दुसरा देखील मद्यपान सुरु करतो.
आणि शेवटी पहिला 'मुक्तांगण' आणि दुसरा 'कृपा' मध्ये दाखल होतो!(हो, कारण उगाच हा नसता त्रिकोण आपल्या इथे इतरवेळी मिटिंग मध्ये वगैरे नको!)असो.
हे सर्व डोके दुखावणारे कथानक एकदा रोहिणी निनावे यांना दिले पाहिजे! मग त्या यावर नक्कीच पाच ते सहा हजार भागांची महामालिका लिहितील. नंतर प्रत्यक्षात टीव्हीवर आणायला एकता कपूर आहेच!..आणि बघायला?...अर्थातच सर्व रिकामटेकड्या स्त्रिया....




Tuesday, 21 December 2010

04/10/2010

आज बिडी झोन मध्ये गप्पा ऐकत बसलो होतो. त्या होत्या तमाशा, बारी आणि एकंदर थिएटर विषयीच्या. याबाबत मी स्वतःशी विचार केला असता, पैसा आणि परिस्थिती या दोन्ही बाबत मी स्वतःला सुखी मानतो. कारण जर घरची परिस्थिती जर अत्यंत चांगली (आर्थिक) असती, तर मी काय केले असते देव जाणे!
ज्याला निव्वळ अय्याशी असे म्हणता येईल ती मी सुरुवातीच्या पाच ते दहा वर्षात केली. मात्र ती दुस-यांच्या पैशावर! वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत माझी दारू नियमित मात्र नियंत्रित होती. त्यावेळी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणा-या मित्रांच्या नादाने त्यांच्या पैशांनी हे शौक केले. मात्र अठरा ते तेवीस या वयाच्या काळात मी तेथे जायचो ते फक्त भरपूर दारू पिण्यासाठी! असो.
हे एक आणि दुसरी बाब की मी अजून गांजा वगळता ब्राऊन शुगर/चरस हे कधी पहिले देखील नाही आणि पहायची इच्छा देखील नाही. यापैकी बारीचे आकर्षण हे नसण्याचे कारण पैसा नसून माझ्यामते त्या नादात भल्या-भल्याचे जे झाले, त्याचा मी एक साक्षीदार असल्याने त्यापेक्षा दारू बरी, या निष्कर्षापर्यंत मी आलो. कारण जुगार, दारू पेक्षा देखील मी थोडा आउटलाईन शी संबंधित असल्याने यात बरबाद झालेली माणसे मी पहिली होती.
मात्र राहून राहून एक विचार असा डोकावतो की, हेच दारूच्या बाबत का होत नसावे? कारण मी आता मागच्या महिन्यात 'आनंदवन' इथे दाखल असताना मला माझे मित्र उदयन कायंदे यांचा फोन आला की आमचा सोलापूरचा मित्र अनिकेत अवसेकर याने फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. हा तिशीतला मुलगा, एक दोन वर्षाचा फरक सोडता समवयस्क म्हणता येण्याजोगा. घरी हॉटेल, लॉज, बार असे सर्वकाही...
त्यातही तुलना करता आपले मन अजून तितके कमकुवत झाले नाही असे जाणवते.
याच वेळी मला आनंदवन मधील, ज्याचे उत्तम व्यक्तिचित्र होऊ शकेल असा चरसी मुलगा, आदिल चरसी आठवतो. वय साधारण बावीस. हा लहानपणापासून चरसी झालेला. आता त्याने 'सायको' ची प्राथमिक अवस्था गाठलेली. याला पाहताना मी दारू पिल्यावर हिंस्त्र होतो असे कुणी सांगितले तर भीती वाटते. 
भीती कदाचित जेलची नसून आपण वेडे होऊ की काय याची असते. आणि आपण काय करतो हे कळत नाही त्यामुळे स्मरणशक्ती नष्ट होण्याची देखील. असो.
आज tda देखील नेहमीप्रमाणेच (टंगळमंगळ करत ) केला.

Monday, 20 December 2010

01/10/2010

हा रीलॅप्स खरा तर सध्या सोप्या आणि स्पष्ट शब्दात सांगायचे तर त्याचे वर्णन 'माज' असे करता येईल. पण माझ्यामते ते तितकेसे खरे नाही, कारण याबाबत माझे असे मत आहे की, 'कृपा' किंवा ए.ए. चे साहित्य हे विशिष्ट प्रकारचे संस्कारच असतात, त्यानुसार माझ्यात कांही मला आणि इतरांना देखील जाणवणारे बदल हे होत असतात. त्याचे कांही सकारात्मक परिणाम देखील मला मिळू लागतात. मात्र त्याचवेळी हे बदल मला नकोसे देखील होतात. किंवा ते तसेच राहतील का? मला ते पेलवतील का? या शंका मनात घर करतात. त्याचा परिपाक किंवा परिणीती ही हा रीलॅप्स घडण्यात होते.
आज आउटपूटमध्ये वेक अप कॉल यासंबंधी बोलण्यास सांगितले. पण मी ते टाळले कारण वेक अप कॉल ला वास्तवाची 'जाणीव' हा शब्द वापरणे उचित राहील. (पण इथे 'जाणीव' या शब्दाचे पेटंट आणि कॉपीराईट असल्याने त्याचे हक्क घेऊनच वापरावा लागतो!)तर माझ्याबाबत ख-या अर्थाने ही जाणीव पहिल्या अॅडमिशन मध्ये तब्बल चौथ्या महिन्यात झाली!
कारण त्यावेळी मी कोणत्याही प्रकारे स्वतःपुरते देखील पैसे न कमावता केवळ दारू पीत राहणे असे काहीतरी ध्येय बाळगून होतो. कारण दारू मी बंद करू शकतो, दारू 'सुटू' शकते, किंवा सोडायची आहे हा विचारच मी करू शकत नव्हतो. तेंव्हा स्वतःकडे त्यादृष्टीने विचार सुरु केला, तेव्हाच माझ्यासाठी ख-या अर्थाने 'वेक अप कॉल' होता.
त्यानंतर दोन वेळा प्रयत्नात अडथळा आला, स्लीप(!) मूळे, मात्र ती आजाराचाच एक भाग म्हणून आणि परत पीत बसने हा काही उपाय नाही हे जाणून परत प्रयत्न सुरु केले. त्यात अजून एक अडचण अशी सतावते, की, मनासारखे पैसे, नोकरी  नाही मिळाली तर पुढे काय? कारण मी आतापर्यंत दारू पिणे आणि भांडणे या व्यतिरिक्त काही केलेच नाही!
आता दुसरा मला सतावत असणारा मुद्दा, की, जोपर्यंत मी मला आवश्यक वाटतील तेवढे पैसे कमावण्यास सक्षम होईन तोपर्यंत माझा भाऊ मला पैसा पुरवेन, असे म्हणाला तो त्याचा मोठेपण आहे... मात्र... त्यात पुन्हा अटीचा प्रश्न की दारू पिली तर परत रस्त्यावर.....
 
त्यासाठी हे अवलंबित्व नको वाटते.
आता थोडे जी. ए. च्या कथा वाचत आहे त्या वाचताना आयुष्यांत दु:खाची आणि निरर्थकतेची जाणीव होते त्यावरून दोन-चार दिवसांपूर्वीची बातमी आठवली, की..'नीलहिलइझम' या कसल्याशा इझम वाल्या मुलाने २००० पानी (निश्ते सारख्यांच्या अभ्यास करून) इमेल पत्र लिहून आत्महत्या केली.
त्याची कीव वाटली.कारण त्याआधी त्याने जी.ए.ची कथा एकतरी वाचायला हवी होती!
द.भी.कुलकर्णी यांनी त्यांना आयुष्यातले दु:ख वेचीत हुडकत फिरणारा फकीर म्हटले आहे,  ते अतिशय योग्य आहे.

Friday, 17 December 2010

12/07/2010

इतके दिवस काही तरी बोलल्यावर आज जास्त काही लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही, पण येत्या बुधवारी किंवा मी जाईन तेंव्हा माझा दृष्टीकोन बदलला म्हणजे काय? तर यावेळी 'चौकशी' ला सामोरे जाण्यासाठी (यात काही नवीन नाही!) पण निदान की कामच करणार नाही, हे पक्कं असल्याने टेन्शन नाही. कारण याआधीपर्यंत जे अकार्यक्षमतेकडे झुकणारे वर्तन होते, ते तरी निदान कमी होईल. शिवाय आता इतर वेळ घालवण्याचे चांगले पर्याय दिसू लागले आहेत. आणि शिवाय दारू इतर कोठेही उपलब्ध असतेच, मग जिथे जास्त वेळ active addiction मध्ये वेळ घालवला तेथे थोडा ताण हा जाणवणारच. असो.
माझ्या मूळ पदासाठी वाट पाहत दारू पीत राहिल्याने खरेतर आज हि वेळ आली हे पटणे अथवा मान्य करणे हा देखील माझ्यामते दृष्टीकोनात्मक बदल असू शकतो. कारण जरी मला आजपर्यंत चांगलेच लोक भेटत गेले, हि वस्तुस्थिती असली तरी, त्याचा कितपत गैरफायदा घ्यावा? यालादेखील मर्यादा असते हे देखील त्याच शिक्षणाचा भाग होय.
इतरांना माझ्यापासून आणि मला इतरांपासून त्रास होणार नाही अथवा, कमीत कमी होईल (कारण त्रास होणारच नाही असे नाही) या दृष्टीने काही काम केल्यास ती देखील तत्व म्हणून पाळता येतील. शब्दांच्या जंजाळात हरवणे हे आता जमत नाही आणि कविकल्पना आता मला परवडणा-या नाहीत. त्यापेक्षा गिल्ट, भीती,न्यूनगंड-अहंगंड आदी वाटत नसेल तर एखाद्याच्या कानाखाली वाजवणे हे देखील rational आहे, असे मी मानतो.
तर ret हि केलेल्या कृत्याची जबाबदारी घ्यायला शिकवते असे ज्यावेळी म्हणतो त्यावेळी जबाबदारी हा शब्द मला फार संयमाने घ्यावा लागेल असे वाटते.
शिवाय आज माझ्या या निवडीला कदाचित घरचेच नको असे म्हणण्याची शक्यता आहे, मात्र आता दुसरे पर्याय आहेत, आणि हा दोन्ही कोणत्याही परिस्थितीत निदान clear राहून साध्य होतील असे वाटते.
त्यामुळे आता जास्त न लिहिता, स्वतःच स्वतःला all the best म्हणतो!

नमस्कार,
आमच्याकडूनही तुम्हाला
all the best!!
वैशाली मॅडम

Monday, 13 December 2010

09/07/2010

मला कुत्री खरं तर मनापासून आवडत नाहीत, मात्र आज लिसा (कुत्री) दोन-तीनदा पायातून घोटाळत गेली. तेंव्हा समजले कि आज ती खिन्न आहे कारण आज तिची पिल्ले सोडून देण्यात आली. मलाही अस्वस्थ वाटले. पण त्याचवेळी मनात विचार चमकून गेला...'तुला कुत्र्याचे बरे कळते?' तेंव्हा भावनाप्रधान, संवेदनाक्षम वगैरे म्हणवताना माणसांच्या बाबतीत ती कोठे जाते कोण जाणे!
आज प्रार्थनेच्या आउटपूट विषयी की जे मी मागील qt मध्ये लिहिले आहे त्याप्रमाणे मला काय आवडते आणि माझ्यासाठी चांगले काय?
यातील आणि मला काय शक्य आहे व काय अशक्य आहे, यातील फरक समजणे म्हणजेच शहाणपण हे साधारणपणे सांगण्यास योग्य वाटते. मात्र हे शहाणपण येण्यासाठी god ला मी प्रार्थना करतो तेंव्हा विचार, संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास काही काळ व्यक्ती आणि सद्सदविवेकबुद्धी जागी करणारी घटना, प्रसंग इत्यादी इत्यादी. हे सर्व खरे आहे मात्र, माझी 'सरेंडर'ची भावना खरी वाटणारी असली तरी फसवी असते कारण तेंव्हा मी 'अहं ब्राह्मस्मी' च्या तो-यात स्वतःलाच देव समजत असतो. कारण मी स्वतःला शहाणा समजतो. हे महत्वाचे वाटते ते यासाठी की, जरी वरवर हो हो म्हटले तरी कुणी (बाह्य व्यक्तीने) मला विचारले की, 'तू आता 'कृपात' आहेस तेंव्हा, व्यवसाय, नोकरी, नातेसंबंध किंवा मनातील गोंधळ याबाबत तू तुझ्या कौन्सिलरचे ऐकशील का?' तर..
तेंव्हा मी पटकन बोलेन, 'मी कांही वेडा नाही! कौन्सिलर मला उद्या विहिरीत उडी मारायला सांगतील! मी मारीन की काय?'
तेंव्हा हे विसरून जातो की पुढचा भाग... माझ्या भल्यासाठी कार्यरत असलेली उच्च शक्ती ती ए.ए. वा 'कृपा' पण ...पण माझ्यासारख्या दारुड्याचा कोणावरच विश्वास नसतो..अगदी स्वतःवर देखील!
पण माझ्या बाबत तरी जरूर तेवढे समजून घेऊन त्यानुसार कृतीचा प्रयत्न करणे मात्र हि अवस्था पूर्ण न झाल्याने किंवा न समजल्याने 'झैलसिंग' सारखी झाली आहे.
त्याचे असे आहे की, झैलसिंग यांना इंग्रजीचा प्रॉब्लेम असल्याने राजीवजी आपल्या सुधारणावादी दृष्टीने त्यांना केम्ब्रिज येथे पाठवतात. परत आल्यावर त्यांना चाचणी घेतात, ती अशी की त्यांनी तिथे उपस्थित सर्वाना 'कम हियर' असे इकडे ये असे नाव घेऊन म्हणायचे असते ब-याच लोकांना ते बोलावतात. आता नजमा हेपतुल्ला यांना तिकडे जा असे सांगण्यास राजीवजी सांगतात..त्यावर झैलसिंग विरुद्ध कोप-यात जाऊन म्हणतात,'नजमा, काम हिअर!!' आता परत त्यांना इंग्रजीचे बेसिक शिकण्यासाठी राजीवजी ऑक्सफर्ड येथे पाठवतात. परत आल्यावर त्यांना एबीसीडी म्हणायला सांगतात. त्यावर झैलसिंग विचारतात, "जी पहलेवाली बोलू या दुसरेवाली?"
विनोदाचा भाग सोडला तरी काही बाबतीत हि अवस्था आहे खरी!
शिवाय भावनात्मक प्रसंगांना rational दृष्टीकोनातून बघणे आणि हाय सेल्फ इमेज याबद्दल मी नंतर बोलेनच. हे सर्व लिहिताना कधी कधी हसू येते की, कारण आमच्या गावाकडे जर कुणी या वह्या पहिल्या तर म्हणतील, "साधी दारू सोडायची! तर त्यासाठी एवढा खटाटोप कशाला?"
साधा मनावर कंट्रोल असला की पुरे!!
हेही खरेच आहे. पण त्याशिवाय माझुई छोटी बहिण म्हणते त्याप्रमाणे, तुला काही झाले नाही, होत नाही, तुला आलाय माज!!
हे देखील तितकेच खरे!!!

नमस्कार,
सगळं कळतंय ते बरं आहे!
आपले विचार किंवा दृष्टीकोन बदलला आहे असं आपण म्हणतो तर मग ते कसं?  ते सांगू शकाल का?
तुमच्या प्राथमिकता कोणत्या आहेत, ते जरा विचार करून ठेवा. आपण बोलू.

वैशाली मॅडम

Monday, 6 December 2010

07/07/2010

माझी सेल्फ इमेज कदाचित 'हाय' असू शकेल, मात्र मी मागच्या आउटपूट मध्ये सेल्फ एस्टीम बद्दल सांगितले की, स्वत्वाच्या ज्या पाच पातळ्या किंवा मापदंड आहेत, ओळख, सुरक्षा, तुमच्यासोबत कोण?, पात्रता...इत्यादी. या सर्वांमध्ये माझा सेल्फ एस्टीम हा अत्यंत लो दिसतो, असे जाणवते. असो.
आज आउटपुटमध्ये मोहित सरांनी एक टेस्ट घेतली. त्यात माझे रीलॅप्सचे चान्स २०% इतके आहेत म्हणजेच ८०%सुधारण्यास चान्स आहे! हे मी सकारात्मक दृष्टीकोनातून वगैरे लिहित नाही, तर त्यात विचारलेल्या कांही पश्नांच्या माझ्या उत्तरांवरून लिहित आहे. उदा: तुम्ही सगळ्या जगावर रागावला आहात काय? हे असले कांही माझ्याबाबत होत नाही. सगळ्या जगा-बिगावर आपण नाही रागवत बाबा! त्यामुळे माझ्यात सुधारणेला वाव आहे असे मी मानतो. असो.
आज टर्निंग पॉईंट मध्ये नीलकंठ सर होते. मिटिंग आगोदर मी त्यांची बोललो होतो. आम्ही जे बोललो तेच मिटिंग मध्ये पुन्हा ते बोलले उदा: व्यसन चालू असताना (active addiction ) मध्ये जी मंडळी (घरची सोडून ) आपल्याला पाहत असतात, त्यांच्यात परत जायला कितपत संकोच वाटतो? हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी इथलेच उदाहरण दिले आणि 'बित गया सो बित गया' म्हणून सोडून पुढे जातो असे सांगितले. मात्र मी ते अजून करू शकत नाही. 
पण त्याचबरोबर एक मुद्दा त्यांचा आवडला की, काल(किंवा आजदेखील) जी चार माणसे मला वाईट समजतात, त्याचप्रमाणे शंभर माणसे चांगला देखील समजत असतात हे देखील इथे ध्यानात ठेवले पाहिजे. पण इथे देखील 'the others ' च्या वरच अवलंबित्व दिसते. असो. आणि पुस्तकाच्या झेरॉक्स प्रती दिल्याबद्दल धन्यवाद!
त्या पुस्तकातील काही कल्पना आवडल्या त्यात कॅरम खेळताना सहज जाणीवपूर्वक केल्या उदा: ऐनवेळी कच खाण्याची वृत्ती आणि त्यापाठीमागचे स्वागत तसेच डॉ. नाडकर्णी यांची कुल टेन्शन ची संकल्पना इत्यादी. अर्थात हे कदाचित हास्यास्पद वाटेल मात्र असे लहान लहान प्रयोग करायला मला आवडते. यानंतर लांबणीवर पडलेला मुद्दा, 'नकारात्मक भावनांची यादी करणे' हे कंटाळवाणे वाटते. आणि असे कांही वाचत असताना मी भयंकर रॅशनल वगैरे असल्याचा भास होतो!!
आता सर्वात आणि अत्यंत महत्वाचे..(हे शेवटच्या पाच मिनिटात लिहिण्याचा दंडक आहे.....)
ते असे की...मी एक साक्षात 'योगी' आहे, असा साक्षात्कार मला आज सकाळी, 'मिस्टर रॉब' यांनी घडवला!
तो असा की, त्यांनी योग म्हणजे काय हे सांगताना यम/नियम/आसन/प्राणायाम/प्रत्याहार/धारणा/ध्यान आणि समाधी या  ज्या आठ अवस्था सांगितल्या त्यापैकी मी व्यसन काळात (active  addiction )मध्ये पहिल्या सात अवस्था 'स्किप' करून डायरेक्ट थेट आठव्या समाधी अवस्थेस प्राप्त होत असे!
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत या अवस्थेचे वर्णन केले आहे, ते म्हणतात, त्यानुसार ब्रम्हांडाचे दर्शन देखील मला होत असे! सूक्ष्माती सूक्ष्म प्रत्यय आणि निराकारता त्याचप्रमाणे मला स्थळ/काळाचे देखील बंधन नसायचे!
थोडक्यात, आत्मा परमात्मा एकरूप व्हायचा!
पण फरक इतकाच की, कांही नतदृष्ट लोक त्यास आंग्ल भाषेत black out म्हणत!(म्हणोत बापडे!, त्यांना हि अवस्था काय ठावूक?)


नमस्कार,
चला, हे बरे झाले की तुम्ही एवढी परमावधीची अवस्था अनुभवली हे भारीच! आम्हा पामरांना ते अजून जमलेले नाही.असो. ८०%आशा म्हणजे छानच!
फ्राईड म्हणतो ते खूप बाबतीत लागू पडतं, selective forgetting
किंवा selective hearing किंवा selective attentiveness हे सगळं असतंच त्यामुळे निगेटिव्ह कॉमेंट आपण जास्त लक्षात ठेवतो. सकारात्मक खुपदा घेताच येत नाही. त्याबद्दल  acceptance च नसतो. व त्या अळवाच्या पानावरून पाणी जातं तसं घसरून पडून जातात. compliments आणि नकारात्मकच लक्षात राहतं. तर त्यावर काम करावं लागतं तर साहित्यामध्ये काहीतरी करून दाखवा हेच तात्पर्य !

वैशाली मॅडम

 

Monday, 22 November 2010

05/07/2010


आजच्या बोलण्यातून शेवटी audult  विषयी कल्पना एकंदर स्पष्ट झाली. मात्र तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मागच्या वेळी मला या सर्वांची गरजच वाटत नव्हती. कारण शेवटी ज्या दोघा-चौघांत मी राहणार आहे, तिथे मी राहणार कि नाही? हाच प्रश्न होता. तो तब्बल पाच महिन्यानंतर स्पष्ट झाला.
तितक्याही दिवसत मी 'याला काय वाटेल', 'त्याला काय वाटेल' याचाच जास्त विचार करत असल्याने 'मला काय वाटते' याकडे कधी बघितलेच नाही. आणि basic needs मधेच गुंतून असल्याने तिकडे दुर्लक्ष झाल्याचा संभव आहे.
त्याचबरोबर मी म्हणतो त्याप्रमाणे 'घरची धुनी' धुण्याचे हे ठिकाण नव्हे. हेदेखील खरे आहे. कारण इथे आपली दिशा फक्त कशी असावी याबाबत मी प्रयत्न करू शकतो. इतरांना मी बदलणे अशक्य आहे. असो.
आज आउटपूट मध्ये माझ्या मते सरांची देखील सेल्फ इंटरेस्ट बद्दल थोडी गल्लत झाली असे वाटते. (कदाचित चुकीचे असू शकेल) कारण इंटरेस्ट हा शब्द बहुतेकांनी आणि शेवटी सरांनी रस, गोडी या अर्थाने वापरला.जसे : त्यांना संगीतामध्ये '
इंटरेस्ट' आहे, तसा इतरांना कॉमर्स, इंजिनिअर यांत असू शकतो. हे सांगितले.
इंटरेस्ट हा स्वहित या अर्थाने इथे वापरणे माझ्यामते संयुक्तिक ठरेल. कारण जरी मला कला शाखेत इंटरेस्ट(रस)असला तरी संधी नसल्यामुळे अथवा प्राप्त परिस्थितीत अपरिहार्यच असेल तर अर्थ, शारीरिक कष्ट इत्यादी इंटरेस्ट(रस)नसलेल्या बाबी इंटरेस्ट(स्वहित)साठी करणे भाग आहे. असो.
कारण मला हे कळले किंवा आत्मपरीक्षण हे माझ्या 'स्वहिता'साठी असले, तरी तुम्हाला बोअर न करणे हे 'परहित जाणा' याखाली येत असल्याने तूर्त थांबावे हे उत्तम!
आज जुने काही कागद काढताना मागे, इथे आउटपूट मध्ये कांही वेगळे प्रकार घेतले, त्यात एका कागदावर प्रत्येकाचे एकमेकांनी काय आवडते आणि काय आवडत नाही हे हे लिहायचे असे कांही होते. तो फाटका कागद पाहताना करकरे मॅडम यांनी माझ्या आवडते खाली 'motivated ' आणि आवडत नाही खाली introvert असे लिहिले होते. माझ्या मते मी तसा
introvert  नाही कारण ब-यापैकी पारदर्शकता माझ्यात आहे. कारण एकंदर व्यक्ती/घटना या दारुड्याच्या आयुष्यात कमीच असतात. त्यामुळे जे आहे, ते सांगणे व किमान इथे तरी लपवण्यासारखे काही नसते.
मागे दिवे आगर इथे समुद्रकिनारी फिरत असताना भावाने विचारले, "या समुद्राचे वर्णन एका शब्दात कसे करशील?" मी उतरलो, "अथांग." तसेच माझेही आहे. माझे वर्णन एका शब्दात करू शकतो, 'दारुडा!' असो.
'कृपा'मधील इतर कांही फायदे हळूहळू दिसले. पण एक फायदा झाला की पेपर आणि टीव्ही ची सवय मोडली! आज 'भारत बंद' आहे, हे देखील आत्ता कळले.
यासंदर्भात,  खरे तर हा राष्ट्रव्यापी बंद असल्याने तसा मुख्यमंत्र्यांचा कांही दुरून देखील संबंध येत नाही. हा (महागाई) सर्वस्वी केंद्राचा विषय आहे. तरी एक जन मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत होता, तेंव्हा त्याला एक गोष्ट सांगितली.....
प्राचीन काळी एका राज्यात सलग दोन तीन वर्षे दुष्काळ पडला. जाणता मुख्यमंत्री मेला. त्याची जागा भरून काढण्यासाठी, जो पाऊस कधी पडेल हे सांगेल त्याला मुख्यमंत्री करण्याचे राजाने ठरवले.
सर्वत्र दवंडी गेली. आणि असा माणूस शोधण्यास अधिकाऱ्यांचे जथ्थे रवाना झाले. कांही अधिकारी जंगलाजवळील रस्त्याने जात असता तेथील एका छोट्या वाडीत त्यांचा मुक्काम पडला. दुस-या दिवशी ते जात असता तेथील धोब्याने त्यांना जाऊ नका असे विनवले. कारण विचारताच त्याने आता भयंकर पाऊस पडेल असे सांगितले. त्यांनी ते ऐकले आणि ते थांबले. आणि खरोखरच पाऊस जोराचा पडला. तेंव्हा अधिका-याने विचारले, 'तुला कसे कळले की पाऊस पडणार?' त्यावर धोबी उत्तरला, "गाढवाच्या कानावरून! पाऊस पडणार असेल तर गाढव कान खाली टाकते.त्यावरून कळते की आज पाऊस पडेल!'  हे ऐकून त्यांनी गाढव आणि धोबी दोघानाही राजाकडे नेले आणि राजाने गाढवास मुख्यमंत्री केले.....
आजही तीच प्रथा चालू आहे!!

नमस्कार,
तुम्ही म्हणता तसे सेल्फ इंटरेस्ट बद्दल झालं असेलही, मी सरांना विचारेन. पण तुमची कॉन्सेप्ट क्लीअर आहे ते बघून छान वाटले.
घरची धुनी इथे धुवू नयेत याला मी सहमत नाही. कारण जरी त्या लोकांबद्दल आम्ही कांही action  level वर करू शकत नसलो तरी तुमचा (पेशंट) स्वभाव detail  मध्ये कळण्याकरिता त्याचा एक तर उपयोग होतो व तेच matter कधी कधी आम्ही त्यात पडलो बोललो तर चांगल्या पद्धतीने सुटते किंवा थांबते. आपण यावर बोलू.
सेल्फ इमेज ह्या गोष्टीवर काम करणे तुम्हाला जरुरीचे आहे असे वाटते. कारण विरोधाभास जाणवतो. दारुडा असं कोण्या एका माणसाचं वर्णन पुरं होतं का? ह्यावरून वाटतं की inferiority   चे फिलिंग आहे की काय? पण at the same time काही बाबतीतला firmness किंवा तापटपणा पहिला की वाटतं की सेल्फ एस्टीम आणि इमेज high  आहे की काय?
यादेखील विषयावर आपण बोलू..बाकी गोष्ट भारी!as usual .

वैशाली मॅडम

Tuesday, 16 November 2010

02/07/2010

आज किंवा आताच जे तीन पेशंट अॅडमिट झाले, त्यापैकी एकाची अवस्था फारच वाईट होती. तो खूप भूक लागली म्हणतो पण एखादेच बिस्कीट कसेबसे खातो. त्याला उठून बसवावे लागते. अर्धवट बेशुद्धी, आणि आता दारू हळूहळू उतरत असल्याने विड्रोल ची लक्षणे...कमालीचा अशक्तपणा हे सर्व पाहत असताना मला एक वर्षापूर्वीची माझी अवस्था आठवली. कोणीतरी शेअर केले तसे आता एक सराव केला पाहिजे की, obsession आले की हि अवस्था आठवण्याचा सराव केला पाहिजे. कॅजुअल अॅप्रोच आता थोडा दूर ठेवला पाहिजे असे वाटू लागते.
खरं तर कुठलीही घटना, संदर्भ मी माझाशी जोडू शकतो. त्याचा अन्वयार्थ माझ्यापुरता लावू शकतो. मी जेंव्हा एखादे पुस्तक वाचत असतो तेंव्हा त्यातील एखादे वाक्य त्या त्या कथानकाशी आणि पत्राच्या तत्वज्ञानाशी सुसंगत असतेच, मात्र त्याचा संदर्भ मी माझ्याबाबत देखील लावू शकतो. 
उदा: जसे, "आपला भविष्यकाळ वर्तमान झालेला कदाचित माणसास पाहता येईल, मात्र भूतकाळ वर्तमान झालेला पाहण्यास बहुदा तो जिवंत राहत नाही." हे आठवण्याचे कारण की, जर मी भूतकाळासारखी दारू पीत राहिलो तर निश्चितच फ्रेम मध्ये जाईन.(पुन्हा आपल्या नशिबी 'फ्रेम' तरी आहे की नाही कोण जाने!) कारण सकाळी इनपुट मध्ये संगीता मॅडम प्रार्थनेविषयी बोलताना काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही याविषयी सांगत होत्या. नंतर चहा पिताना कान्हेरे व मी बोलताना कान्हेरेंनी एक शेअरिंग सांगितले. की एक एक दिवसाच्या हिशेबाने पंचवीस वर्ष सोबर राहून एकाने त्या पंचवीस वर्षांचा 'भूतकाळ' देखील बदलून दाखवला! हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे, की तो चाळीस मधील पंचवीस वर्षे सोबर आहे आणि पंधरा वर्षे सातत्याने पिऊन राडा करण्यात गेली. हा काळ एकदम न घेता जर पंचवीस वर्षांचा घेतला तर निश्चितच तो भूतकाळ बदलू शकतो. असो.
आपल्या इथे एकजण  स्वतःशीच बडबड करतो. मी देखील काहीतरी जोरात बोललो (स्वतःशीच) तेंव्हा एकाने, 'त्याच्यासारखा ' काय बोलतो आहेस? असे विचारले.तेंव्हा मी म्हणालो , काही नाही self talk मोठ्याने झाला!
आपल्या नोटीस बोर्डवर एक अब्राहम लिंकनचे पत्र आहे. त्यातील बरेचसे शब्द तसेच ठेऊन स्वतःचे दोनचार आणि येथे सतत कानावर आदळणारे शब्द घालून 'व्यसनमुक्ती केंद्रातील गुरुजींना पत्र' एका सोबर बापाचे असे काहीतरी लिहिले आहे. नंतर दाखवेन.

Monday, 15 November 2010

30/06/2010


आज रीलप्सचा वर्क पेपर बघितला. त्याविषयी वर्कपेपरच्या वहीत लिहिलेच आहे. पेपर पूर्ण लिहिला नाही, कारण डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.त्यावर लिहित होतो. म्हणून पेपर लिहिला नाही. पेपर का सोडवायचा? तर त्यातून स्वतःची स्वतःला एक नवीन ओळख प्राप्त होते. चुका समजतात, आणि मार्गदर्शन देखील प्राप्त होते. हे खरे असले तरी....
वर्क पेपर लिहिताना मी मुद्दामच पाल्हाळीक भाषा, विस्तार आणि साचेबद्धपणा मुद्दाम, जाणीवपूर्वक टाळला आहे. (मी मागच्या एका  केंद्रात होतो तेंव्हा माझ्या मनातील ऐसपैस लिहिण्याऐवजी माझ्या कौन्सिलरला साचेबद्ध उत्तरे हवी होती!)
साचेबद्ध या अर्थाने की, मी तसे लिहीन देखील मात्र 'सामाजिक नुकसान' यात काय लिहिणार? मी संपूर्ण दारुडा ज्या वयात झालो, त्या वयात समाजाशी ख-या अर्थाने  माझी पुरती ओळख देखील झाली नव्हती....'आर्थिक नुकसान' मी लौकिकार्थाने पैसा कधी कमावलाच नाही....ते एकच आणि शारीरिक पातळीवरचे नुकसान कदाचित सांगता येईल, मात्र मानसिक नुकसानीचा अद्याप अंदाज देखील नाही.  असो.
मी जुने QT वाचतो त्यावेळी, ब-याचदा हसू येते. की त्या वेळी आपले विचार 'असे' होते! पण ते विचार आता पूर्णत: बदललेले असतात. हे सहज घडत नाही त्यामागे कांही न कांही काम जाणीवपूर्वक केलेले असते.
बदललेले विचार, त्यासोबतच इतरांपेक्षादेखील स्वतःच्याच स्वतःकडून वाढलेल्या अपेक्षा, आणि ज्यावेळी अशा अपेक्षा वाढतात त्यावेळी त्या त्या अपेक्षापूर्तीसाठी योग्य ते परिश्रम घ्यायची माझी तयारी नसते.
इतरांना दु:ख न देता मी आनंदी आणि 'सोबर' राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे हेच मी सोयीस्करपणे विसरतो. आणि त्यात भर म्हणजे मला माझ्या आनंदाची व्याख्या देखील ठरवता येत नाही.
आज कान्हेरेंचा सोब्रायटीचा पहिला वाढदिवस झाला. तेंव्हा त्यांनी सांगितलेले देखील पटते की, एकदम स्वभावदोष वगैरे काढण्यापेक्षा या भानगडीत न पडता प्रथम कृतीपासून दारूपासून दूर राहिले पाहिजे;
म्हणजे पुन्हा एकंदरीत प्राथमिकता दारू न पिणे हि आली. पण माझ्यामते वेळ द्यायला हवा याचा अर्थ त्या वेळेत जमेल इतपत स्वतःवर काम करणेदेखील आवश्यक आहे.
जसे, मी एखादी घटना मला वाईट वाटली, तर त्याचे विश्लेषण करत बसतो...त्याचप्रमाणे एखादी घटना मी टाळली, किंवा अगदी मनासारखी झाली तरी त्याचा स्वतःपुरता अर्थ लावून विश्लेषण करण्याची सवय लावून घ्यायला हवी. पुन्हा असो.
आता काल स्वार्थासंबंधी लिहिल्याने स्वहित आणि स्वार्थ यांत गल्लत होत नसली, तरी आत्मकेंद्रित वृत्तीमुळे क्षणिक समाधान आणि स्वहिताला बाधा पोचल्याचे जाणवते. हे जाणवते तर कधी? तर नुकसान झाल्यावर! त्यासाठी positive self talk कसा असावा?
त्याचबरोबर कोणत्याही केंद्रातील , 'मी येथे का आहे?' हा सनातन प्रश्न जसा वैदिक संस्कृतीत को SS चे उत्तर   सो SS हम आहे तसे आहे. आणि माझ्या बाबत या  प्रकरणाचा संदर्भ घ्यायचा तर, आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे...
'हौसेने केला पती..
त्याला फुटली रगतपिती...!'
आणि आताच परत काय दक्षता घ्यावी हे समजले नाही तर पुन्हा हरिदासाची कथा मूळपदावर येऊन परत "QT पंचविशी" लिहिण्याचा प्रसंग ओढवेल!(यात पुन्हा विक्रम कोण आणि वेताळ कोण हा प्रश्न आहेच...!)


नमस्कार,
आपण यासंदर्भात बोललो आहोतच पण  self direction + concern about others
हे देखील स्वहीतामध्ये include असतं. self talk मध्ये माझ्या मते +ve किंवा -ve हे नंतर, मुळात जे वाटतं(परिस्थिती,मानसं) त्याचा awareness असणे जरुरी आहे. दुसरे म्हणजे घडणा-या गोष्टीत emotions ऐवजी rational approach असावा. आपण हे उदाहरणादाखल बोलू म्हणजे I can explain .

वैशाली मॅडम

28/06/2010

आज ए.ए. मिटिंगला जायचे असल्याने थोडाच वेळ आहे, तरी तुम्ही जो प्रश्न विचारला होता की, lust किंवा वासना यापेक्षा काही बाबतीत स्वतःला सिद्ध करणे हा हेतू असतो का? तर उत्तर निश्चितच होय असे आहे. ब-याचदा केवळ सेक्स पुरता नाही तर इतर सर्व बाबतीत performance मधील कमी हे आणि त्या अनुषंगाने येणारे न्यूनगंड आणि योग्य मार्गदर्शन न मिळण्याचा तो माझ्यामते एकत्रित परिणाम असतो.
वय इथे महत्वाचे नाही, तर दृध्तीकोन इथे महत्वाचा आहे. कारण स्थळ, काळ वेळ यांचे भान न ठेवल्याने घडणारे मनोरंजक किस्से
देखील मला ठाऊक आहेत. असो. 
आता स्मरणशक्तीवर परिणाम झाला आहे हे कबूल करावे लागते त्यामुळे जोर देऊन आठवावे लागते तेंव्हा कांही प्रमाणात माझ्या आत्मकेंद्रित (दारूसंबंधी, कारण इथे माझे हित नाही) स्वभाव किंवा वर्तन यांचे निकोलो मकव्हली याच्या म्हणण्यानुसार, मनुष्य हा जन्मत: धूर्त, लबाड, कापडी, आणि कोल्हयाप्रमाणे असतो, स्वार्थी असतो. इतरांचा स्वार्थ हितासाठी आणि इतर कशासोबत असेल मात्र माझ्यासारख्या दारुड्याचा स्वार्थ हा केवळ बाटलीभोवती फिरत असतो!
स्वार्थासंबंधी मनुष्याच्या जन्मजात कशा प्रेरणा असतात, हे विश्वास पाटील यांच्या झाडाझडती या कादंबरीत एका खेडवळ बाईच्या तोंडून, जी विस्थापित, धरणग्रस्त आहे. सांगतात.......
'मास्तर, माणसाची जातच मतलबी. मनुष्य जन्माला यायच्या आधी पोटात फार अडचणीत असतो, त्याला बाहेर यायचं असतं, पण आईला व त्याला त्रास होणार असतो, तो देवाला विनवणी करतो की, सोडव यातून....देव स्वयंभू असल्याने त्याला आईचे दूध माहित नसते, ते त्याच्यासाठी मौल्यवान असते. तेंव्हा बालक त्याला आईचे दूध देयचे कबूल करतो. देव हा त्रास सोडवून त्याला जन्माला घालतो तेंव्हा देव म्हणतो, आता माझे दुदु (दूध) दे! यावर लबाड बाळ म्हणते....कवा sss
कवा sss (केंव्हा?केंव्हा?मुळात ते ट्या असे वाटते) मी असे कवा म्हणालो? मी दूध देतो असे म्हणालोच नाही. अजूनदेखील बाळ दुध पिताना इकडे तिकडे देव दिसतो का ते पाहते!आणि देवाने दूध मागितले तर रडते आणि त्याला विचारते,.......कवा sss कवा sss ....

Wednesday, 10 November 2010

25/06/2010

एक गोष्ट खरी आहे, की माझ्यात maturity किंवा परिपक्वता याचा अद्याप अभाव आहे. खरं आहे कारण दोन-तीन दिवसाखाली सायंकाळी जोशी सरांनी immaturity  ते maturity या विषयावर त्यांनी लिहिलेला लेख दाखवला त्यात फक्त लक्षणे होती. ती वाचली. त्यात बहुधा अवलंबित्व आणि असुरक्षिततेची भावना इथपर्यंत फक्त समजले. म्हणजे तिथपर्यंत ते माझ्यात जाणवते हे खरे.
पण तुम्ही म्हणता ते 'childish ' वागणे, हि नकळत होणारी क्रिया असेल किंवा जाणीव, awareness नसेल तर घातक आहे. यासंदर्भात माझात आणि सारंग सरांत बिडीवरून एक संवाद झाला. तो जोशी सरांनी ऐकला होता. मी त्यांना विनोदाने विचारले, 'याला जर strategy म्हटले तर? सर देखील विनोदी हसून म्हणाले, "याला over maturity असे म्हणतात.' मी म्हणालो, तसे नाही...शब्द जरी थोडा असभ्य असला तरी याला शुद्ध मराठी भाषेत 'शुद्ध हरामखोरी' असे म्हणतात!'
यातील विनोदाचा भाग जरी सोडला तरी, खरोखर भूतकाळ न विसरता विसंवादाचे संवादात रुपांतर शक्य व्हावे याकडे कसे पाहता येईल? हा खरं प्रश्न आहे.
पुन्हा आज Joe-Harry window मधील I know-you know या विंडोत राहनेसाठी 'पारदर्शकता' ही नेहमी आवश्यक असते. ती माझ्यात माझ्यामते जवळ जवळ आहे, पण...ती फार असेल तर थोड्या काळासाठी का होत नाही पण मारक ठरते याचा अनुभव आज आला. झाले असे की, मी आज आळस आणि चालढकल हे दोन स्वभावदोष घालवण्याच्या उद्देशाने (!) (खरे तर व्हॉलीबॉल बंद झाल्याने) वेंगुर्लेकर यांना मोठ्या लाकडी फांद्या, खांब कापून देण्याचे ठरवले. आता मला ते काम जमते. म्हणजे  I know-You know या फ्रेजमध्ये आलो. काल त्यांना हवे तितके कापून दिले. म्हणजे predictability  आली.
तर आज ते खांब रोवण्यापासून ते दुसरे खांब कापण्यापर्यंत काम अंगाशी आले! असो. काम केल्याने माणूस मारत नाही वगैरे खरे असले तरी छोट्या छोट्या गोष्टीत (कारण इथे काय...किंवा बाहेर काय...मोठे कांही घडणारच नसते....पुहा एकदा असो!) फार लक्ष देऊ नये हे उत्तम!आणि खरे! कारण यामुळे ही फ्रेज जेमतेम अर्धाच तास टिकते!
 
I don't know-you don't know या फ्रेजमध्ये मी किमान काही काळ, काही घटना यापुरता तरी मी मर्यादित होतो. त्यावेळी सरांनी आउटपूट मध्ये सांगितले की, किमान इथपासून ते I know पर्यंत येण्यास self discovery आवश्यक आहे. मग माझ्यामते QT देखील तेच आहे....(QT लिहिणे हा माझा पिढीजात व्यवसाय नाही...असे सांगणे तोंडावर आले होते मात्र संयम ठेवला!) अजून एक बाब मी इथे निरीक्षण केली की, कांही लोक मी इथे राहतो (इतके दिवस...न कुरकुर करता...) याचा फार हेवा करतात. कारण दोन महिने काय नि चार महिने काय...माझ्यावर कसलीच जबाबदारी नसल्याने (असे मी समजतो) Happy go lucky टाईप वागता येतं. टेन्शन न घेता इथे राहता येतं.
याबाबत 'सरकार' या सिनेमातला एक 'डायलॉग' मी एकाला ऐकवला....
"नजदीक का फायदा सोचनेसे पहले दूर का नुकसान सोचना चाहिये!" पण याचवेळी जर लोक देखील सिनेमे पाहतात ते याचाच दुसरा भाग असलेल्या "सरकारराज" मधील
'डायलॉग' ऐकवतील....
"नजदीक का नुकसान सोचनेसे पहले दूरका फायदा देखना चाहिये!" असो.
आपण (मी) यात न पडता, पिल्ले सरांचे एक वाक्य ध्यानि ठेवावं......

"short term goal sobriety...
                long term goal sobriety...!!"  

 

Wednesday, 3 November 2010

23/06/2010

आज एक negativity विषयी एक टेस्ट मोहित सरांनी घेतली. त्याची उत्तरे हो आणि नाही यास्वरूपात या वहीत आहेत आणि निष्कर्ष तुमच्या कौन्सिलर्सकडे सांगण्यात येतील असे सांगितले. हे एक बरे झाले. कारण असे आठवून आठवून नेमक्या नकारात्मक भावना कोणत्या हे ओळखणे जरा कठीणच जाते अशक्य नाही मात्र कठीण आहे! यानंतर त्यांनी एक बाउन्सर की गुगली म्हणूया की जर दहापेक्षा जास्त हो असतील तर सर्व negative म्हणजे एकंदरीत सर्वच negative !म्हणावे लागेल. याविषयी समक्ष बोललेलेच बरे! अजून एक बाब अशी की रिलेशनशिप मध्ये मात्र कांही रिजाईंटमेंट या इगो आणि त्या अनुषंगाने discomfort anxiety ने तयार झालेल्या आढळतात.आणि याव्यतिरिक्त इतर रिलेशनशिप म्हणजे गर्लफ्रेंड वगैरेचा प्रश्नच नाही त्यात एक बाजू सामाजिक स्तर किंवा upbringing ची असली तरी दुसरी म्हणजे व्यसनाधीनतेची प्रचंड लाज आणि त्यानुसार guilt हि आहे. त्यामुळे कदाचित अजून बोलणेही व्यवस्थित जमत नसावे या निष्कर्षापर्यंत मी आलो आहे. असो. अजून भरपूर बाकी आहे. म्हणजे इथे काय किंवा बाहेर काय विनाकारण सल्ले देण्याची एक जन्मजात उर्मी दारूड्यांना असते, तशी ती माझ्यात देखील आहे. दोन दिवसापूर्वी 'बायकोशी पटत नाही', 'प्रकरण घटस्फोट घेण्यापर्यंत गेले आहे.' असे एकजण आम्हास सांगत होता.(आम्ही=मी कारण सल्ले देताना मी सुज्ञ असतो!) तर आम्ही त्यास सांगितले की, अरे, तू कामधंदा करतोस, तू घरात असतोसच किती? बारा घंटे कामात गेले सात घंटे झोपण्यात (प्रणय वगैरे रोज कोणी करत नसेल आणि केला तरी तो वेळ त्यातच मोजणे.) गेले. दोन तास जेवण किंवा आन्हिके उरकण्यात गेला दोन तास घरात इतर सभासदांसोबत गेला म्हणजे राहिलेला अर्धा-एक तास तू बायकोला देऊ नाही शकत? ऐकून घ्यायचं.....'बरे असेही नाही की होय रोज रोज तोंड पाहून कंटाळा आला असेल....हे ऐकून समोरचा पापभिरू तक्रारदार होय अशी पटल्यासारखी मान हलवतो आणि आम्ही समाधानाने दुस-यांना सल्ले द्यायला निघतो...
पण त्याचवेळी हाच प्रश्न स्वतःला विचारावा वाटतो...की आम्ही हेच घरी का करत नाही?(फरक बायकोच्या जागी आई आणि कामाच्या ठिकाणी सिनेमा किंवा बाहेर..) असो. हेदेखील करून बघायला हरकत नाही (समजा उद्या बायको आलीच तर त्रास नको!)
इतर भावनांविषयी टेस्ट मधील प्रश्नात असल्याने सविस्तर लिहित नाही.
'turning point 'मध्ये सचिन छान बोलला आणि अरुण आणि त्यांच्या पत्नी देखील चांगले शेअरिंग केले. उत्तमप्रकारे आपले अनुभव सांगून गेले. तसे या मिटिंगमधून बरेच घेण्यासारखे आहे.
आता प्रश्नोत्तरामूळे  जास्त लिहिण्यासारखे नाही आणि एकदा टेस्ट negative च आहे तर त्यासंबंधी एक विनोद....
एका सुशिक्षित, श्रीमंत मुलाला बघण्यास मुलीकडील मंडळी येतात. चहापान झाल्यावर, प्रश्नोत्तरे सुरु होतात. त्यात मुलाला विचारले जाते, का हो, मुलगा दारू पितो असे ऐकले खरे आहे का? त्यानंतर मामा (मुलाचे) सांगतात की,  त्यात काही वावगं नाही हो सध्या तशी फशनच आहे!
नंतर जुगराविषयी छेडले असता मामा सांगतात की ते श्रीमंतीचेच एक लक्षण आहे!
तीच बाब गर्लफ्रेंड अथवा बाईविषयी कारण हे श्रीमंतांचेच नाद आहेत. असे मामा सांगतात आणि वर जर हे नसेल तर मुलात काही कमी आहे असे समजतात, अशी वर मल्लीनाथी देखील करतात/ यावर मुलीचे वडील उद्गारतात, 'एकंदरीत काय! सर्वच negative !या मुलात 'positive 'काही आहे की नाही?
आहे ना, मामा उत्तरतात.
काय?
HIV Positive!      मामा उवाच!!

नमस्कार,
जोक भारी आहे...
तुम्ही जो स्वतःबद्दल प्रश्न विचारला आहे तो फार योग्य आहे. की सगळं कळून सावरून मग real मध्ये मधला ताण तसाच का राहतो? वर्षानुवर्षे त्याच भावना, तीच intensity हा जो आपला प्रवास आहे तो विचार करण्यासारखा आहे. स्वतःची growth , maturity यांत दिसते का? बटन दाबलं की पंख लागतो आपलंही काही बाबतीत तसंच का? यामध्ये काही बदल व्हावा असे वाटते का? (resentment, revenge, anger)
मनात ठेवून comfortable वाटतं का? मुख्य म्हणजे जर बदल करायचा असेल तर स्वतःसाठी  हे पहिले clear डोक्यात ठेवा. ह्यात उदात्त भावना नाही.

वैशाली मॅडम
 

21/06/2010

Qt  मध्ये काय लिहावं?  हा प्रश्न किंवा असा प्रश्न मला कधीच पडत नाही. काहीतरी विचार करून त्यानुसार थोडे लिहायला माझ्यामते हे एक उत्तम माध्यम आहे. म्हणून आज दोन महत्वाच्या आणि एक 'अत्यंत महत्वाच्या' मुद्द्यावर लिहावे लागेल असे वाटते.
तर पहिला मुद्दा असा की, आज 'पहला कदम' हा व्यसनमुक्तीकडे नेणारा माहितीपट वजा बोधपट पाहिला. जोशी सरांनी याविषयी QT  मध्ये लिहू शकता असे सांगितल्याने लिहावे किंवा लिहायचे म्हणजे 'पहला कदम' मध्ये दारुडा सुधारल्याचे positive चित्र दाखवले आहे. तपशील (माहितीपटाचा) वगळता माझ्या बाबतीत पडताळून पाहायचे तर 'त्याला' लवकर कळले आणि मला थोडे उशिरा! असे म्हणावे लागेल. कारण 'एकच प्याला' आणि 'देवदास' सारख्या अजरामर शोकांतिका जितक्या प्रभावी आणि ख-या वाटतात, तितका सुधारणेचा माहितीपट वाटत नाही कारण शेक्सपिअर च्या हेम्लेट, आणि इतर शोकांतिका सदैवच ख-या वाटतात. मला तरी आतापर्यंत दारुडा कधी सुधारू शकतो यावर विश्वासच नव्हता!असो.
आता दुसरा मुद्दा सायंकाळी (रविवारी) आई व भाऊ पालक मिटींगला येऊन गेले तेंव्हा जुजबी बोलून थेट डिस्चार्जलाच ये असे सांगितले. जास्त बोललो नाही. आपण मला आईविषयी empathize करण्यास लिहिले होते 
त्या संदर्भात मागे कधीतरी वाचलेले प्रसिद्ध पाश्चात्य नाटककार टेनेसी विल्यम्स यांच्या दोन नाटकांचा अनुवाद विजय तेंडूलकर यांनी फार सुरेख केला आहे. त्यात 'काचेचे घर' हे सन १९३७-३८ ,अधे लिहिले असावे.या 'काचेच्या घरात' मुख्य तीन पत्रे आई, मुलगा, मुलगी. बाप म्हणजे  या मुलांचा बाप आणि त्या बाईचा पती हा दारू पिऊन, त्रास देऊन मेलेला असतो. मुलगी प्रौढ कुमारिका (तिचे वेगळेच भावविश्व) आणि मुलगा एका कारखान्यात कामाला जात असतो आणि आताशा चोरून चोरून दारू पिऊ लागलेला असतो.
तो आपल्या नव-याच्या वळणावर अथवा वाटेने जाऊ नये यासाठी जीवापाड झगडणारी, काळजी वाहणारी आई, आणि मुलीसाठी नवरा हुडकताना तो निर्व्यसनी असावा यासाठी आटापिटा कारणी आई, तिचा भावी पती दारू तर पीत नाही ना यासाठी कमालीची जागरूक आई, मुलगा आपल्याच फँटसीत...ते पाहून कळवळनारी आई....हे सर्वच एकंदरीत कमालीचे हृद्यद्रावक वाटते. अमेरिका असो किंवा इंग्लंड किंवा भारत साल १९३६ असो २००९ स्थळ काळ कशाचाही या मद्याच्या समस्येवर उपाय नाही! असो. माझ्या बाबतीत सांगायचे तर आता आईने तिला वागावे तसे वागावे. अमुकच एक असा माझा अट्टाहास नाही. उलट मी माझ्या परीने कधी नाटक/सिनेमाला घेऊन जातो. पण संवाद अथवा बोलणे मात्र सहसा जास्त होत नाही. त्यामुळे आहे त्यात किंवा प्राप्त परिस्थितीत हसून-खेळून राहावे असे वाटते.
आता अत्यंत महत्वाच्या अशा तिस-या मुद्द्याविषयी......की मी रोज तीन/चार पाने Qt लिहितो...याचा अर्थ मी दररोजच्या 'कृपा' मधील घडामोडी, गॉसिप, आणि तक्रारी लिहितो असा समाज आमच्या एका आफ्टरकेअर मधील मित्राचा झाला आहे.
त्यामुळे गेला महिनाभर ते सर्वांनाच QT मध्ये अमुक लिहा तमुक लिहा...अमक्याची तक्रार करा असे काहीबाही सांगतात! पण काळ कमाल झाली म्हणजे ते चक्क मला जवळ बोलाऊन घेऊन म्हणाले, तू इतका लिहितो तर त्यात 'हेही' लिही!
मी पडलो भिडस्त स्वभावाचा माणूस! म्हणून आज लिहिणे भाग आहे!ते 
'हेही' असं की....आज (रविवारी) मटण शिजलेच नाही!(मला नक्की माहित नाही, कारण तामसी आहार सेवन केल्याने वृत्ती तामसी होते असे ऐकून मी सध्या तूर्त तामसी म्हणजे मांसाहार वर्ज्य केला आहे!) त्यामुळे ते सांगतात तसे मटण शिजले नाही याची नोंद घ्या!
आता पुढे लिहावात नाही कारण जोशी सरांना विचारा...असे लिहायचे ठरवल्यावर एकटाच कितीतरी वेळ हसत होतो आणि मटण शिजले नाही यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल हे देखील जोशी सरांना नक्कल करून दाखवली(sorry )


नमस्कार,
यावर काय लिहू? माझी नक्कल केलेली फार मस्त! आपण बोललो असल्याने जास्त लिहित नाही तरी पण, आईच्या relation वर काम करणे जरुरी वाटते का? ते सांगा.

वैशाली मॅडम
 

Tuesday, 2 November 2010

18/06/2010

आता QT लिहिताना छान रिमझिम पाऊस पडतो आहे. वातावरणात मळभ दाटल्याने थोडेसे औदासिन्य आलेले आहे.....अशा कातरवेळी, एकटेपणात कुणाचीतरी आठवण येते(असे म्हणतात!)... तसे आज मला प्रकर्षाने माधव गोळेंची आठवण आली.(हसण्याचा विषय नाही खरेच!) आणि त्यांच्या एका विधानाचाच (जे मागच्या वर्षी ते येथे दाखल होते तेंव्हा) विचार करत बसलो...
त्याचे असे झाले की, मागच्या वर्षी मी येथे होतो(त्यात नवल काय? त्याच्या मागच्या वर्षी 'मुक्तांगण' ला होतो.) त्यावेळी साधारण सप्टेंबर महिना असावा वातावरण असेच तीन-चार दिवस ढगाळलेले, कुंद आणि पावसाचे होते. त्यावेळी त्या दिवसात हे माधव गोळे अगदी एकटे बसत. तेंव्हा मी त्यांना विचारले,'काय माधवराव? दोन-तीन दिवसापासून जरा 'डिस्टर्ब' वाटताय?'
त्यावर त्यांनी शांतपणे स्थितप्रज्ञासारखे (किंवा तसा आव आणून ) सांगितले,"गेले दोन तीन दिवस विचार करतोय की या वातावरणात 'ऑब्सेशन' येतं की नाही?"
हे ऐकून मी वेड्यासारखा खोखो हसत होतो कारण 
'ऑब्सेशन' चा विचार (येतं की नाही?) हा करत बसणे वा तपासात बसणे हेच सर्वात मोठे  'ऑब्सेशन' माझ्यामते आहे.
माझ्याबाबत
'ऑब्सेशन' हा प्रकारच घडला नाही असे म्हटले तरी चालेल कारण दारू बंद (बराच काळ ) असल्यानंतरचा हा विषय आहे!
दारू बंद करण्याचा जीवाच्या भीतीने वा काहीतरी मोठे घडल्यावर क्षणिक पश्चातापाने जरूर कांही दिवस बंद करीत असे पण हा आमच्या भषेत आजपर्यंत रेकॉर्ड टाईम हा १००दिवस इतका आहे आणि या १००दिवसात किमान लाखवेळा तरी असले
'ऑब्सेशन' आले व ते मी टाळले असेल.
दारू बंद ठेवण्याची प्रामाणिक इच्छा हवी किंवा तसे प्रयत्न करण्यास मी मुळातच तयार नसतो. कारण मला बदल हवेत मात्र त्यासाठी लागणारे प्रयत्न फार नकोत, असे काही तरी आहे... या दहा -अकरा महिन्यात छोटे-छोटे बदल कायम राहावेत म्हणून देखील प्रयत्न करणे पण (इथे दोन महिने राहणे देखील नकोसे वाटते!)
'ऑब्सेशन' हा मुद्दा लांब ठेवला तरी दारू सोडल्यानंतर निर्माण होणारी पोकळी भरून काढण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करतो आहे मात्र, आता एखाद्या दुस-या पर्यायाची निवड करावी लागेल असे वाटते.

16/06/2010

इथे काय किंवा मुक्तांगण सारख्या ठिकाणी आम्हा सतत येणा-या लोकांना नवीन पेशंट हे 'सिनिअर' या नावाने संबोधतात! का कोण जाणे, पण त्यांना एक बाब काळात नसावी की, हे सतत येतात याचा अर्थ यांना कांही कळले नाही, आणि त्यामुळे वारंवार यावे लागते. पण होते उलटेच आम्ही त्यांना सराईत वाटतो! त्यामुळे साहजिकच कांही शंका-कुशंका आम्हाला ते विचारतात..
आपल्या इथे कधी कधी प्रचंड बोअर करणारा आउटपूट नावाचा एक प्रकार आहे, तो कधीकधी कंटाळवाणा वाटतो.(नेहमी नाही) कारण आमच्या वामकुक्षीची ती वेळ असते. तेंव्हा एका पेशंटने वडिलकीच्या नात्याने मला विचारले, की आता
आउटपूटमध्ये काय सांगायचे? मी शांतपणे उत्तरलो, म्हणालो, हे बघ सोपं आहे, फळ्यावर जेजे असेल तेते मी केले किंवा माझ्याबाबतीत झाले असे सरळ सांगायचे..अगदी सोपे! तेंव्हा आता जास्त विचार न करता झोप आणि मलादेखील झोपू दे.
हे १००% खरे आहे कारण डिफेन्स काय किंवा व्यसनाचा ग्राफ किंवा आलेख हा यात मला सर्व टप्पे आलेलेच असतात!बचावाचे पवित्रे मी कळत-नकळत वापरलेलेच असतात आणि 'टोटल डीफीट' पर्यंत मी आपोआप आलेलाच असतो त्यात मला वेगळे कांही करावे लागत नाही, जाणीवपूर्वक कांही प्रयत्न करावे लागत नाहीत.
मात्र रिकव्हरी चे तसे नाही, तिथे एक एक टप्पा जाणीवपूर्वक घ्यावा लागतो. जागरूकता लागते. त्यासाठी कृती आवश्यक आहे.(आमची तिथेच बोंब आहे!)  
काल ए.ए. मिटिंग मध्ये गजाभाऊचे शेअरिंग झाले तर आज turning point मध्ये भागवतांचे! मी दहा-अकरा महिने कसाबसा दारू न पिता राहिलो त्यामुळे मला स्वतःचेच कौतुक वाटू लागले आहे तेंव्हा या लोकांचे तर अगदी जास्त वाटते!त्यात नवल नाही.
याच संदर्भात ध्यानाचा विषय निघाला तर सारंग सरांचे देखील कौतुक वाटते. परवा एकाने त्यांच्या अर्धा-एक तास ध्यानस्थ बसण्यावरून थोडी चेष्टा केली. त्यावर मी त्याला सांगितले की मला जी बाब जमत नाही ती दुसरा सहज करतो त्याचे मला कौतुकच वाटते.
मी दारू प्यायचो तेंव्हा कुणी न कुणी माझ्या सोबत 'सोबत' म्हणून असायचे तेंव्हा असाच 'एक' माझ्यासोबत होता. आम्ही पिऊन फिरत होतो...मी रस्त्यात टपरीवर गुठखा घेतला..त्याला दिला नाही. पुढे डोंबा-याचा खेळ चालू होता...एक लहान मुलगी सायकलच्या चाकातून उड्या मारून दाखवत होती... मी तिला पाच रुपये दिले, तोच तो 'एकजन' मला म्हणाला, 'काय हे त्या मुलीला विनाकारण पाच रुपये दिलेस आणि मला एक रुपयाचा गुठखा नाही दिला?...'
मी म्हणालो, 'तू देखील त्या सायकलच्या चाकातून उडी मारून दाखव..तुलादेखील पैसे देईन!..' असो.
आता इथे  बसल्या
बसल्या काहीतरी उद्योग म्हणून थोडेफार लिहित आहे. तुम्हाला वेळ असल्यास दाखवेन. कारण तुम्ही म्हणता तशी संवेदनशीलता वगैरे माझ्यात असेलही पण माझा आतापर्यंतचा बहुतांश वेळ गुत्त्यात किंवा टिंगल टवाळी करण्यात गेला(अगदी घरात देखील)त्यामुळे सर्वच विनोदाने घ्यायची सवयच लागून गेली आहे.

नमस्कार,
तुम्ही म्हणता की सर्व विनोदाने घ्यायची सवय लागली आहे. पण मी या विधानाशी सहमत नाही. कोणी काहीही (घरच्यापैकी) बोललं जे जरा लागट आहे, तर त्याचा तुम्हाला त्रास होतो हे तर खरे आहे ना? म्हणजेच त्या comments तुम्ही seriously घेता! ह्याचा अर्थ असा की भावनांची तीव्रता आणि संवेदनशीलता तीव्र हि अजूनही जवळच्या लोकांबाबत आहे. तर ते accept स्वतःशी व जमलं तर संबंधितांशी communicate करा. कदाचित फरक पडेल.
तुम्ही लिहिलेले मी जरूर  वाचेन मला त्यात इंटरेस्ट नक्कीच आहे. 

वैशाली मॅडम

Sunday, 31 October 2010

14/06/2010

आज भेटायला आई आल्यावर आनंद देखिल वाटला पण.. एकीकडे विषाद देखिल वाटत होता कारण जेंव्हा तिने सांगितले की, बस मधे चढ़ता येत नाही, कारण माझ्यामुळेच तिला हा अधूपणा आला आहे हे सहज विसरता येत नाही.
तुम्ही आर्थिक प्रश्नाविषयी विचारलंत तेंव्हा आज खरेच माझ्याकडे पैसा असता तर मी निश्चितच अजूनही दारूच पीत राहिलो असतो. माझ्यात व भावाच्यात जरी सामंजस्य आहे तरी आज कामापुरता पैसा आहे म्हणून आततायी निर्णय घ्यायचे नाहीत असे ठरवले आहे. कारण त्याचे काय करायचे? अन्यथा पैसा कसा वाढवता येईल याकडे माझे निश्चितच लक्ष आहे. पण जेंव्हा लौकिकार्थाने जेंव्हा कामाचा विषय निघतो तेंव्हा मला फक्त मर्यादाच दिसतात. कारण जेमतेम बुद्धी आणि कसलाही अनुभव नाही, व्यवहारज्ञान नाही, आणि समाजाची भीती, हि ती करणे होत. दारू न पिताच राहायचे तर इथे काय किंवा मला घरात कोंडून घेऊन देखील राहता येईलकी! पण त्याला अर्थ नाही. जिथे माझा कुणावर आणि कुणाचा माझ्यावर विश्वास नव्हता तिथे आता हळूहळू बसत चालला आहे हे  देखील काही कमी नाही तेंव्हा एखाद-दोन वर्षे अवलंबित्व काही वाईट नाही. हे सर्व लिहिण्याचेही कारण आहे की, मी पटकन विसरतो. त्यासाठी कधी निवांत क्षणी वाचून ह्या जाणीवा जागृत ठेवाव्या लागतात.
आत्ता हे लिहिताना फळ्यावर इनपुटचे डिफेन्स लिहिलेले होते तिकडे नजर गेली. मी स्वतः एकेका डिफेन्सचे पूर्ण वह्या भरभरून उदाहरणे देऊ शकतो कारण तेवढी मी ती वापरली आहेत. पण आता त्याबाबत कधी कधी जागृत नसतो हेदेखील मान्य!
पण खोटं बोलणे हे पार हाडीमाशी मुरलेला डिफेन्स आहे. आता मी कणेकरी वाचत होतो तेंव्हा शिरीष कणेकरांनी थापाड्या व खोटारडा असे दोन भाग केलेले आहेत त्यापैकी मी थापाड्या या गटात निश्चित मोडतो! कसा काय? तर त्यांनीच एक उदाहरण दिले आहे की, समजा एखादा मनुष्य कुणाला भेटायला सिटीबसने आला तर ...खोटारडा माणूस सांगेल की, 'त्याचं काय झालं, आज गाडी गरेज मध्ये कामाला निघाली...टूव्हीलर भावाने नेली...आणि taxi वेळेवर मिळाली नाही...रिक्षा देखील नाही..तेंव्हा बसने यायला लागले...'यात तो खोटे बोलत असतो आणि आपल्याकडे गाडी,
.टूव्हीलर आहे, आणि taxi रिक्षाने यायची आपली ऐपत आहे, आणि आज आगदी नाईलाजाने बसने यायला लागले हे त्याला दाखवायचे असते!
२     "थापाड्या"  हा खोटं बोलायचे म्हणून बोलतो!
उदा: समजा एखाद्या मनुष्याला विचारले, 'आज टू जेवण काय केलेस?' तेंव्हा या थापाड्या व्यक्तीने जर
'वरणभात' खाल्ला असेल ते तो 'पिठलेभात' असे सांगेल! वास्तविक त्यात असा काय फरक आहे? किंवा दर्जात काय फरक आहे? पण खोटं बोलायचे म्हणून बोलणारा तो थापाड्या!
माझ्या बाबत हे होते कारण मी जर 'अलका' ला 'लालबाग परळ' सिनेमा पहिला तर मी तो 'नीलायम' ला पहिला असे सांगेन यात दर्जाचादेखील, तिकीटाचाही फरक नाही! असो.
आज पाऊस पडत होता तेंव्हा जोशी सर पेटी घेऊन आणि सचिन ढोलके घेऊन बसला असता, जोशी सरांनी दोन मिनिटे कोणकोणत्या रेल्वे लाईन वर कोणकोणती गाणी गातात हे साभिनय करून दाखवले! तेंव्हा त्यांच्याकडून हि कला शिकून घ्यावी म्हणतो!
निदान घरून काही मिळो न मिळो उपाशी तरी मरणार नाही! सरांना 'फ्री टाईम' कधी असतो ते विचारून घ्यायला लागेल एकदा!


नमस्कार,
तुम्हाला इतक्या सर्व जाणिवा आहेत, भावना वाटतात पण तुम्ही त्या स्वतः जितक्या समजू शकता पण त्या संबंधित व्यक्तीपर्यंत पोचवत नाही, तर काय उपयोग?
अजून एक सांगायचं होतं की नात्यांमध्ये जो कडवटपणा वाटतो तो जर कमी करायचा असेल तर काही काम त्यावर करायचं असल्यास बघा. empathy  हा जो प्रकार आहे, स्वतःच्या आईने त्या त्या वेळी जे decision  घेतले (जे तुम्हाला पटले नाहीत) ते कदाचित चुकीचे असतीलही! परंतु तिचे भावनिक चढ-उतार, तिच्या insecurities , तिचा एकटेपणा हा कधी समजून घेतला आहे का? तिला कुणाचा आधार आहे? मोठा मुलगा (ज्यावर आया खूप भिस्त ठेवतात) आधार देत नसेल तर तिची मानसिक अवस्था काय झाली असेल? तर if you empathize, the bitterness may so down! please give it a try!
आपण याविषयी बोलूया.
तुमचा नवीन profession चा choice खूप आवडला!!
 

वैशाली मॅडम


Saturday, 30 October 2010

11/06/2010

दारूबद्दल काय स्थान आहे हे आता निश्चित सांगू शकतो तरी यावेळी जेंव्हा येथे आलो तेंव्हा अगम्य आहे, न समजण्यासाठी आहे असे काहीजण म्हणाले पण ए.ए.चे 'बिग बुक' वाचताना सर्व उलगडा होतो कारण तेथे अगदी आम्ही कामुकतेच्या अपराधीपणातून दारू पिली असे देखील सांगितले आहे. याबरोबरच तुमच्या पहिल्या रिमार्क्स मध्ये 'तुम्ही दुस-यांदा 'तिकडे' का गेला? असा प्रश्न होता ते ते वातावरण मला कांही नवीन नाही ह्या पाच सहा महिन्यात भरपूर वेळा तिकडे फिरलो मात्र विचार आले नाहीत कारण वास्तविक आवडणे आणि प्रत्यक्ष कृती यांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे.
दुसरी बाब आशी की मी ज्या नैतिकतेच्या गप्पा आता मारतो त्यात मी म्हणतो की, संधी असून मी तसा वागत नाही (तपशीलात जाण्याची गरज नाही कारण माझे पहिले कौन्सिलर सांगतात की, माणसाने नेहमी खरे सांगावे पण खरेच सगळे सांगू नये!) तर जेंव्हा मी ज्या सामाजिक स्तरातून येतो, किंवा व्यसनकाळात जेथे राहत होतो, तेथे देखील कांही तत्वे होती पण सर्वच अनैतिक अथवा एकदम नीतिवान असे कांही नव्हते. हे सर्व तेथे देखील होते मात्र माझ्यावर काळात नकळत झालेले 'संस्कार' हे आणि अनुभव ज्यात अनैतिकतेचे खुनापर्यंत बघितलेले परिणाम या सर्वांचा आणि वाचनाचा कांही प्रभाव या सर्वांमुळे बनलेले एक मत {तत्व नव्हे} याचा परिपाक म्हणून नैतिकता यावर होतो. तेंव्हा या अनुषंगाने येणा-या चार चांगल्या गोष्टीदेखील याबरोबरच येतात. जसे : इतरांना मदत करणे इत्यादी. पण हे चांगले संस्कार उलटवण्यासाठी किंवा साधे घरात पैशाची मागणी करताना बळजोरी करताना एक जबरदस्त ताकद लागते, हे सर्व चांगुलपणा हा प्रवाहातल्या काडीसारखा असतो तो सतत माझ्यासोबत वाहत असतोच पण तो उलटवण्यासाठी जी ताकद, आणि धैर्य लागते ते दारू मला देते.
 
इथपर्यंत ठीक आहे पण जेंव्हा हेच मी दारू न पिता करतो तेंव्हा गिल्ट का? आणि असला तरी नंतर का? हे पुन्हा समर्थन वाटाते. त्यासाठी real self  आणि projected image यांत सारखीच किंवा न पटणारी न आवडणारी असते आणि त्याबाबत मात्र नंतर भयंकर गोधळ उडू लागतो. यामुळे भूतकाळाशी नेहमीच सांगड घातली जाते. याविषयी self talk विषयी बोलले पाहिजे कारण हा गोधळ थांबला पाहिजे. असे मला वाटते. आज खेळ सुरु व्हायला अवकाश होता तेंव्हा आमचा एक पेशंट मित्र त्याच्या सहा-सात वर्षाच्या गोड मुलीला घेऊन तेथे आला. आम्ही सर्वजण तेथे बसलो असता तिने मला डॉमेंट्री कडे निर्देश करून   विचारले , दादा , (हो! कारण लहान मुले अजून मला त्यांच्यातलाच समजतात!) तेथे काय आहे? मी सहज उत्तरलो आम्ही तेथे राहतो. तुझा बाबा देखील तेथेच राहत होता!' पण छोटी फारच चटपटीत होती! ती पटकन म्हणाली, "बाबा! तू मला सांगितलास की तू हैद्राबाद ला गेलास म्हणून...." मग मागून तो मित्र येऊन काहीतरी सारवासारव केली....
मागच्या वर्षी मी मुक्तांगण येथे होतो! तिथे आम्ही दिवाळीत किल्ले वगैरे बांधले होते!(आयुष्यात पहिल्यांदा आणि शुद्धीत!) तेंव्हा माझी भाची तिथे आली होती तिने मला विचारले होते, मामा, तू  इथे राहतो? हे तुझे घर आहे?
हो म्हणालो.....काय बोलणार...?


नमस्कार,
हे वाचून माझीपण पहिली reaction ह्यावर काय बोलणार? अशीच आली.
भूतकाळाची सांगड हि राहतेच विसरू म्हणून तो तो विसरता येत नाहीच पण त्याबद्दलची sensitivity कमी होईल का? आंपण याविषयी सविस्तर बोलू.

वैशाली मॅडम


Wednesday, 27 October 2010

09/06/2010

सध्या उत्तरांची अपेक्षाही नाही तेंव्हा हे सहज सुचलं या सदरात लिहित आहे कारण यावेळी नुसतं बसून काय करणार? असो. आज सारंग सरांचे टर्निंग पॉइन्ट मध्ये शेअरिंग ऐकलं, छान वाटलं. नंतर सहज एका कागदावरचा लेख चिवडा खाताना वाचला..तो काहीतरी 'सकाळ' ला 'करियर' नावाची कसलीशी पुरवणी येते त्या संदर्भात होता. त्यात आजच्या स्पर्धात्मक युगात काम करायचे, तर कसे करावे याविषयी लिहिले होते, त्यात एक उदाहरण देखील दिले होते..ते असे की, दोन मित्र (एकाच व्यवसायातील) एकदा जंगलात जातात. जंगलात त्यांचा रस्ता चुकतो. ते आणखीनच घनदाट जंगलात शिरतात. तेंव्हा त्यांना सिंहाची डरकाळी ऐकू येते. लांबून ती ऐकून एक मित्र आपल्या बगेतून धावण्याचे बूट काढू लागतो. ते पाहून दुसरा विचारतो, हे बूट घालून तुला काय वाटतं? की तू सिंहापेक्षा वेगाने पळू शकशील ? यावर दुसरा सांगतो की, मला सिंहाला मागे टाकायचे नाहीच. मला फक्त तुला मागे टाकायचेय!
वाचून कागद रद्दीत टाकून दिला. (माझ्या मते तीच योग्य जागा आहे.) मी असले वाचून खरेच अस्वस्थ होतो कारण मी कितीही स्वार्थी, आत्मकेंद्रित असलो तरी असा विचार दारू पिताना देखील माझ्या मनाला शिवला नव्हता! माझा स्वार्थ निव्वळ बाटली भोवती फिरत असे.
शिवाय याच संदर्भात मला आणखी प्रश पडतात की, दुस-याला झाडावर चढण्याची कला अवगत नसेल कशावरून? असो. हे आपल्या(माझ्या) तरी डोक्यापलीकडे आहे! मी आजच्या इनपुट च्या अनुषंगाने माझ्या दिवास्वप्नांबाबत विचार करू लागतो तेंव्हा व्यसनकाळात (हा शब्द इथे प्रत्येकजण वापरतो :जसे व्यसन सोडून दहा बारा वर्षे झालीत!) काय काय दिवास्वप्न पाहायचो? तर मी जेंव्हा जेंव्हा दवाखान्यात दाखल होऊन घरी यायचो तेंव्हा क्षणिक पश्चातापाने दारू दोन/तीन दिवस बंद करायचो तेंव्हा घरचे आणि ओळखीचे चार लोक म्हणायचे, बाळ्या, एक तर तू चोवीस तास दारू पितोस, आणि नाही पीत तेंव्हा सतत दारूबद्दल बोलतोस!  
तर 'शराबी' सिनेमात बच्चन जेंव्हा 'बोलबच्चन' करून घर सोडून जायला निघतो तेंव्हा प्राण (त्याचा बाप ) त्याला सुनावतो की, 'लगता है तुमने घटिया शराब पीनी शुरू कर दि है."
त्याचप्रमाणे शराब घटिया असो वा चांगली पण 'सोच' नक्कीच 'घटिया' होते. हे नक्की.
सतत दारू या संदर्भात त्यावेळी हर्षद मेहताचा शेअर घोटाळा प्रसिद्ध होता तेंव्हा, या पैशांचे तीस हजार कोटी (अजूनही तीसवर किती शून्य बारा की अकरा? असा प्रश्न पडतो म्हणून अक्षरी लिहिले!) तुला मिळाले तर तू काय करशील? मी सांगायचो, घरावर एक मोठी टाकी बसवेन आणि ती हातभट्टीने भरून टाकीन! वास्तविक इतक्या पैशात दारूच भरायची तर किमान शिवास रिगल वगैरे तर भरायची! पण नाही! हातभट्टीच भरायची तर त्याला तीस हजार कोटी कशाला? आता तरी किमान हि घटिया सोच दिवास्वप्नात तरी बदलावी म्हणतो! 

नमस्कार,
तुमचा स्वतःबद्दलचा awareness
खूप amazing आहे. मी तुम्हाला काय सांगावे?...
गोष्ट खूप भारी आहे लक्षात राहील. 
regarding future  तुमचा जो self talk आहे तो बदलावा असं मला वाटतं. एका गोष्टीत तुमची clarity खूप आहे की, काय नसावं किंवा काय करू नये. यापुढे नक्की ठरवा की मला काय करणं शक्य आहे व त्यातलं मला काय भावेल? मग आपण त्यावर बोलू.
विसंगती हा विनोदाचा भाग आहे हे तुम्ही म्हणता पण आयुष्यात आपलं बोलणं व वागणं यामध्ये विसंगती येऊ लागली तर फार अवघड जातं. (specially interpersonal relationship
मध्ये) तुम्ही जे म्हणता की दारू एक तर आयुष्यात नाहीतर विचारांत असायची आता काय परिस्थिती आहे? त्याला स्थान दुय्यम आहे का , अजून खालचं? हे प्रश्न स्वतःला विचारा...
तुम्हाला खूप जवळचे काय आहे?
तुम्हाला खूप जवळचे कोण आहे?
आयुष्यात सर्वच गोष्टींबद्दल indifference 
जाणवतो. त्याबद्दल काय stand  आहे? आपण बोलू.

वैशाली मॅडम

Tuesday, 26 October 2010

07/06/2010

मी Qt मध्ये इतकं काय लिहितो आणि मी काय लिहू असे आताच एकाने विचारले. मी म्हणालो, रोजचे विचार, जमेल तसे आपले रडगाणे!..मला अमुक वाटते..मी तमुक करणार आहे, मला असं..वाटतं..वगैरे..लिहायचं जे मनात येईल ते किंवा लिहावे वाटेल ते! पुन्हा विचारलं की रिमार्क्स वर काय लिहायचं? मी म्हणालो, उत्तर म्हणून नाही मात्र त्यावर विचार करायचा. शक्यतो त्यावर लिहायचं नाही. कारण मग ते तेवढ्या पुरतंच मर्यादित राहते.
कारण पूर्वी जेंव्हा मी अर्ध्या मिनिटात रिमार्क्स वाचून एका मिनिटात त्यावर मत नोंदवी तेंव्हा बहुधा त्यात तक्रारीचा सूर असे. म्हणजे मला ते म्हणणे मान्य कसे नाही मी म्हणतो तेच कसे समर्थनीय आहे हे लिहायचो.
पण माझ्या मते त्यावर नीट विचार करणे हेच सरेंडर असावे. आणि चटकन विचार न करता प्रतिक्रिया दिल्यास 'उच्चशक्ती' या संकल्पनेलाच तडा जातो.
आताच शेकडो विषय असतात पण मुद्देसूद काही लिहिता येत नाही. मग त्यावेळी घटनांचा आधार घेऊन संदर्भ देत लिहावे लागते. त्यानुसार विचार व तात्कालिक विचार यांची सांगड घालावी लागते. 
शनिवारी मिटींगमध्ये भूतकालीन संदर्भ घेऊन काय त्रास होतो व त्यावर स्वतः काय उपाय करतो त्यावेळी जास्त वेळ घेऊ नये म्हणून सिनेमाचे उदाहरण दिले. पण प्रत्येक गोष्ट भूतकाळाशी रिलेट करण्याची सवय लागल्याने आणि विसंगती हा विनोदाचा स्थायीभाव आहे तेंव्हा थोडाफार त्यादृष्टीने त्याकडे बघतो. उदाहरणच द्यायचे तर स्लीपची कारणीमीमांसा  करताना सावतःशी म्हणतो, की इतकं स्लीप्चे करणे व परिणाम लिहिण्याऐवजी त्या त्या वेळी परीक्षेत १ल्या /२-या महायुद्धाची करणे-परिणाम लिहिली असतीस तर निदान फर्स्ट क्लास मिळाला असता. दुसरा मुद्दा असा की, फटकळपणा..
माझ्या टेबलावर शेजारी एक काका आहेत. ते म्हणतात, 'हे बघ प्रवीण कुत्रे माझ्याशी इथे, घरी बोलतात..खेळतात..' पुढे ते कांही सांगणार तोच त्यांना अडवून मी म्हणालो, 'ते तसं नाही..कुत्रे बोलतात हे असं नाही.. तर आपण बोलण्यासाठी माणसेच शिल्लक ठेवली नाहीत!' (कदाचित कुत्रे देखील त्यांच्या भाषेत म्हणत असावेत की ;साला काय ताप आहे?!) विशेष म्हणजे त्यांना देखील हे पटते! तीच दुसरी बाब त्यांच्याशीच निगडीत..कुणीतरी कोण कधीपासून पितो यावरून हे 'काका' म्हणाले मी ८८सलि पहिल्यांदा एका केंद्रात दाखल झालो.. म्हणजे आमची नुकतीच सुरुवात होती! त्यावेळी मी फटकन म्हणालो... आता बस करा..गोव-या मसणात गेल्या...'
ते ओशाळून हसले पण त्यावेळी मी देखील खजील झालो कारण त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना केंद्र पाहून बावीस एक वर्षे झाली पण तुला देखील दहा वर्ष झालीच की! उद्या आणखी दहा वर्षांनी कदाचित हेच समोरच्या खुर्चीत बसून तुला कोणी ऐकविल! किंवा माझ्यासारखाच मला सुनवायचा!
तर असे अनेक छोटे प्रसंग भूतकाळाकडे बघण्यास त्यातून शिकण्यास प्रेरणा देतात.

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....