
काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे!
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची?
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे!
काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे!
हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे!
गीत: शांत शेळके
गायक, संगीत: जितेंद्र अभिषेकी
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment