Tuesday, 16 March 2010

वर्षाव


उन्हे उतरली
एक सावली
पुढे दिठीवर थेंब नवा
या वळणाशी
दु:ख उराशी
सूर वितळतो जणु भगवा


स्वप्ने अपुली
कुणी सजविली?
रंग तीरावर व्याकुळसा
नाद उगाळुन
सांज-बनातून
कळप गुरांचा निघे जसा.

माझ्या वक्षी निजती पक्षी
अतुल सुखाची ही धारा
देह अनावर
निज मातीवर
हिमवर्षावात ये वारा....


ग्रेस
संकलन:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....