Tuesday, 16 March 2010

मी निघालो


खाजगी दु:खास दैवी मानणारा वेगळा!
राहूनी माणूस अश्रू वाटणारा वेगळा!

पेटल्या वस्तीत चर्चा ही अशी नाही बरी;
-तो निखारा वेगळा अन हा निखारा वेगळा!

ते भिकारी थोर, त्यांच्या धर्मशाळा वेगळ्या,
चालतो कंगाल सत्याचा गुजारा वेगळा!

सोसण्या आयुष्य थोडे, सोसुनी घ्यावे हसू;
त्या विषासाठी विषाचा हा उतारा वेगळा!

नेहमीच्या यातनांची कैद ही नाही खरी,
मात्र मेलेल्या मनाचा कोंडमारा वेगळा!

हा न टाहो दु:खितांचा, हा सुखाचा ओरडा;
_होत आहे दूर बंडाचा पुकारा वेगळा!

जगलो जेंव्हा न होता माझियापाशी दिवा;
मी निघालो अन उदेला एक तारा वेगळा!


सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....