
शूर अम्ही सरदार अम्हाला काय कुनाची भीती?
देव, देश अन धर्मायायी प्राण घेतलं हाती!
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती
देव, देश अन धर्मायायी प्राण घेतलं हाती!
झुंजावं वा कटून मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं मरुन जगावं हेच अम्हाला ठावं
देशापायी इसरू सारी माया ममता नाती
देव, देश अन धर्मायायी प्राण घेतलं हाती!
चित्रपट:मराठा तितुका मेळवावा
गीत:शांत शेळके संगीत:आनंदघन गायक:हृद्यनाथ मंगेशकर
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment