
ऐल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे ;
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयातुनी आडवीतिडवी पडे;
हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे.
झांकळून जळ गोड काळिमा पसरी लाटांवर;
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर
बालकवी
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment