पाउस
पाउस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने
डोळ्यांत उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा....
या निळ्या उतरणीवरती.
पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
ता-यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला.
संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किना-यावरती
लाटांचा आज पहारा.
ग्रेस
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment