Tuesday, 16 March 2010
आत्मचरित्र
मेलो नव्हतो याच बळाने जगून आलो,
गटारपाण्यावरती हलके तगून आलो;
अब्रूसाठी आडोसाही अशक्य होता,
मिटून डोळे उघड्यावरती हगून आलो;
पडद्यावरती संभोगाचे सूचक चाळे
जांघेमधली खरूज सोसत बघून आलो;
मला न कळले कुठून आली भयाण लॉरी,
जगण्याच्या रांगेमधूनी मी निघून आलो;
अनाम तिरडी आणि पेटली जेंव्हा माझी,
अखेर माझ्या ज्वाळांनी धगधगुन आलो!
मंगेश पाडगावकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
हंस-दमयंती
Dhingana
an alcoholic
- Pravin Kulkarni
- Pune, Maharashtra, India
- Hi.. I am Pravin and I am an alcoholic....
No comments:
Post a Comment