Monday, 8 March 2010
पिंजरेवाले निघाले
हे सराईत हात घालिती घाले,
पिंजरेवाले निघाले पिंजरेवाले;
पाखरांना पावलांची दादही नाही,
रंगुनी नादात त्यांचा खेळ हा चाले;
हे टपोरे घेतले हातामध्ये दाणे,
फेकण्याचे क्षेत्रही हाकेवरी आले;
थुंकती सेवेकरी त्यांचे नभावरती ,
पाखरांच्या विक्रयाचे भावही झाले;
पिंजरा छोटा कुणाला, पिंजरा मोठा,
पाखरांच्या प्राक्तनाला पारखी जाले.
मंगेश पाडगावकर
संकलक:प्रवीण कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
हंस-दमयंती
Dhingana
an alcoholic
- Pravin Kulkarni
- Pune, Maharashtra, India
- Hi.. I am Pravin and I am an alcoholic....
No comments:
Post a Comment