Sunday, 21 March 2010

माचीसच्या चौथ्या मितीतून


माचीसच्या चौथ्या मितीतून
आइनस्टाईनचे मळे हलतात डोलतात
आणि रबराची झाडे
गानिमासारखा मृत्यू घेऊन येतात
माण्सातला तोकोनोमा नष्ट झालाय काय
उजेड
ध्वनी
सुगंध
कुठल्याच संज्ञेचा मोड फुटत नाही हृदयातून
हादरल्या जातात गैशा देवदास्या
हत्याकांडाच बीजारोपण होतंय का माझ्यात कुठं
खूरखिळे करताहेत मेंदूची शकलं शकलं
का मला विसर पडलाय त्या क्रूसावरील
लोंबकळणा-या पाट्यांचा
० तुम्ही उद्या सुखी व्हावे म्हणून
आज आम्ही आमचे प्राण अर्पण
करीत आहोत ०
एखादं ग्रेनेड उरावर दाबून मी फुटूतुटू काय
डायनामाईट लावून मी उडवू काय स्वतःतला
दारूगोळा
की
कावळे झुरळे बेडूक उंदीर गव्तीसाप खाऊन
झोकू साकी
या निर्लेप जंगलात मला कशी आठवत नाही
त्याने केलेली हाराकिरी


नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....