Monday 8 March 2010

दु:ख ज्याने जाणिले


दु:ख ज्याने जाणिले तो का सुखाला भाळतो?
तू मला सांभाळ आता, मी तुला सांभाळतो;

लागले हातास काटे, रक्तही आले पहा:
जो कुणी काट्यास भ्याला तो फुलांना टाळतो:

खिन्न हि वेळा असू दे, मी फुले हि आणिली;
तू अता माळून घे, मी तुलाही मळतो;

ध्वस्त भिंतींचे उभे देऊळ प्रत्येकामध्ये,
मी उभा राहून तेथे जीव माझा जळतो;

जळणाऱ्या वेदनेला शब्द मी नाही दिला,
मी तुला होता दिला तो शब्द आता पाळतो


मंगेश पाडगावकर
संकलक: प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....