
राष्ट्रगीता गाउनी झाले,
जे मिळे ते खाउनी झाले;
नपुसकांची तापली डोकी:
घोषणांनी न्हाउनी झाले;
[लाच शोधाया?] शिताफीने
पोलिसांचे धाउनी झाले;
धोतरे सोडून नेत्यांनी
सर्व आम्हा दावूनी झाले;
शेवटी आमच्याच नावाने
ओठ आम्ही चावुनी झाले!
मंगेश पाडगावकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment