
मौनात गोंदलेल्या
गंधाळ स्पर्शरेषा
मोडू नकोस केंव्हा
त्यांची दुधाळ भाषा
पदरात विभ्रमाच्या
लावण्य मस्त खेळे
गालातल्या खळीचे
मी हुंगलेत मेळे
पानात कर्दळीच्या
लिहिले किती उखाणे
वाचून वेचले तू
उधाणल्या मनाने
आसावल्या क्षणांची
चाहूल पापणीशी
बहरात यौवनाच्या
झुरातेस का मनाशी?
आसवात फसवण्याचा
आता नको बहाणा
ज्योतीत आरतीच्या
बघ ठेवला उखाणा
उत्तम लोकरे
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment