Tuesday, 9 March 2010

फॅमिली रूम्स


मिली रूम्स
विनती बिन्नी जाहिदा फ्रिडा लोरा सलमा
मावा केक्स लिलावलेलं सांवत्सरिक शारीरिक ग्रहगोल
फटिचर पापण्यात वाढलेली वडसं कोळशांचे वृक्ष
खुरपले नाहीत जाणव्यांचे पोतराज
तणांचे बंदिवान तलाव
हजार शक्यतांच्या झुबक्यात
नरडीला नख देऊन घडवला मुरमाड माळ
करवटून बिछान्यात दुंत्यातींत्या हलकल्लोळ
दु:खदायी रात्री
करून घेतले भोसडा उदास
मायाअंग चिरून घेतली जरतारी
रसातळाला दिले उभे आडवे छेद
शिगोशिग भरली टिपाड खरकट्याची
गांडू बगीच्यांना दिले दर्यावर्दी आंदण
उखडून बिजागऱ्या सांदीफांदीत पोसवले
जाताही चाम्डीचोर येताही चाम्डीचोर
दिवाल पकडून नाचवले छत्तीशीचे मोर
चिखल उफाळून अस्तरवला घुंगूरबाल
छपरावरल मांस छिलून सजवले अंगारे धुपारे
शिवले अंगडे टोपडे व्यथांना
नियमितपणे चघळल्या एस. डी. एम.
माथ्यातून अंकुरवली घायपाताची तीक्ष्ण टोकं
सोडले नाडासौंदर आदिअंताच्या मुळाकडे
विनती बिन्नी जाहिदा फ्रिडा लोरा सलमा
सहा पाकळ्यांच छिन्नविछिन्न कमळ
ज्यात सूर्य घुसळला विषधारी
सरोवराचं काळ जांभळं पाणी
ण्डसम मत्स्य तळले पाण्यासकट तिळपापड
जिन्याच्या नक्षीकामातून घरंगळवले आर्टीस्टिक व्हॅल्युज
हबकून दबकून पायरी-पायरीवर
खाजखुजली भिंगरवली शहाळ्या-
शहाळ्यातून
झावळ्यांचे झाप उंचावून टवाळ्याना केली मलमपट्टी
चार आण्याचे आलुबुखार बारा आण्याचे घोडेस्वार
विनती बिन्नी जाहिदा फ्रिडा लोरा सलमा
दरसालातलं दु:ख रांडाकार
माझ्याजवळ माझ्यासाठी माझ्या समीप आकांडतांडव
मावा केक्स
मिली रूम्स
विनती बिन्नी जाहिदा फ्रिडा लोरा सलमा
मी हाकारून आणलेला गौरांग स्वप्नदोषनामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....