
तळहात विघडून जवळपास
तिनं दोन विटाळांतलं अंतर ध्वनित केलंच नाही
वृषणातलं दु:ख घेऊन तिच्याकडे गेलो तर ती
रिकाम्या ग्लासासारखी कोरडीठन्न
लवेचा रंग जात
काखेतील केसांचा प्रकार
हृद्यपीडा ओटीपोट
जांघेतील ग्रंथी
स्वप्नांचा इतिहास
शरीराची साधारण स्थिती
अवांतर विशेष
त्यांचाच चक्रव्युह मांडून ती विसरली समुद्र
उत्थापनाचे वेळी होणारा त्रास काळ आदि दु:ख
ऋतुधर्म सुरु झाल्यावेळचे वय
लैंगिकज्ञान झाल्यावेळचे वय
पहिला संभोग रक्तस्त्राव
संभोगोत्तर मन:स्थिती
आवडनावड गर्भधारणा
क्रिया प्रतिक्रिया परिणाम
वय उंची बांधा
यांचेऐवजी हिशेब ठेवला तिनं हाडाच्या चामड्याचा
चिखलीचा
नि तळहात विघडून जवळपास
मी मावळलो कामेच्छा
नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment