
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वप्ने उधळीत, गेलो झेपावत भविष्याच्या दिशेने घेऊन अगोदरच अटळाचे दर्शन, असे म्हणणारे विंदा आता दर्शनापार गेले आहेत. विंदा करंदीकर यांच्या स्मृतीला नम्र अभिवादन.
देणा-याने देत जावे ;
घेणा-याने घेत जावे.
हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी;
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तांमधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याशा भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी.
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावे.
प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment