शेतीची साधने
सरत सरत
करे पेरत पेरत
मोघडा मोघडा
पेरणीचा चवघडा
पांभर पांभर
मांधे धारये झांबर
कोयप कोयप
निंदाईले सोप सोप
आउत आउत
आला कामाईले ऊत
तीफन तीफन
व्हये शेताचं मापन
चाहूर चाहूर
आता सरलं काहूर
वखर वखर
घाले मायेची पाखर
नागर नागर
सर्व्या सुखाचं आगर
बहिणाबाई चौधरी
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment