१२-१०-२००९
या विषयी सविस्तर मी नंतर बोलेन पण माझा qt मध्ये लिहिण्याचा उद्देश हाच असतो कि केवळ मला सतावणाऱ्या नकारात्मक भावना किंवा मनातला गोंधळ मांडणे.
प्रथमच मी लिहिले होते कि केवळ अलंकारिक भाषा,वगैरे वापरून चांगले मलाही लिहिता येते पण त्याचा येथे कांही उपयोग नाही कारण इथे,इथल्या वातावरणात छानच वाटणार!पण मनात जे गोंधळ,विचार असतात त्यावर लिहिणे,मार्गदर्शन घेणेआवश्यक वाटते.
इनपुट,आउटपुट मध्ये विषय जरी समजल्यासारखे वाटतात पण विचार केल्यानंतर त्यांची खोली फार असते हे जाणवते.मी आधी qt मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मी वेड कशाने लागते,वेडाचे प्रकार किती, त्यावर उपचार काय असू शकतात याची पुस्तके वाचली पण ते लागू नये म्हणून कसे जगावे किंवा फक्त साधे, चारचौघांसारखे कसे जगावे याबद्दल मला पुरेशी माहिती नाही.
कधी कधी वाटते कि,दारू पिऊन वेड वगैरे लागले तर बरे होईल.कारण मग कांहीच करायला नको.हा पलायनवाद कि आळशीपणा?
इथे येण्याआधी माझा निर्णय झाला होतकी,जमीन विकून पैसा बँकेत ठेवावा,दारू पिणे न पीने त्या त्या परिस्थितीत अवलंबून ठेवावे.पैसा लवकर संपला तर विष पिऊन मारता येईल पण दारू सोडायची नाही,इतका टोकाचा विचार मी करत होतो.या तीन महिन्यात निदान ते विचार तरी बदलले आहेत.सविस्तर मी उद्या बोलेनच आपण वेळ द्याल हि अपेक्षा.
नमस्कार,
सध्याचे तुमचे जास्त करून विचार हे निष्क्रीयतेकडे जाणारे आहेत असं समज होतो हे बरोबर आहे का?
तसं होणं फारसं चांगलं नाही.कारण शरीर,बुद्धी,वारली नाही तर गंजून जाते.आयष्यात तुम्हाला नक्की काय हवं [goal ] नुसार कृती काय करायची हे ठरवा.
वैशाली जोशी मॅडम
No comments:
Post a Comment