Saturday, 20 March 2010

देखणा कबीर


दिशावेगळ्या नभाची
गेली तुटून कमान
तुझ्या व्रतस्थ दु:खाचे
तरी सरे ना ईमान!


जन्म संपले तळाशी
आणि पुसल्या मी खुणा
तरी वाटांच्या नशिबी
तुझ्या पायांच्या यातना


भोळ्या प्रतिज्ञा शब्दांच्या
गेली अर्थालाही चीर
कांचावेगळ्या पा-यांत
तरी देखणा कबीर!!


ग्रेस
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....