
पडला दुष्काळ
धरतीवर भयाण ऊन
करपून गेली सृष्टी
आभाळाकडे सा-यांची दृष्टी
डोईवर घडा पायाची होते लाही
डोळ्यातल्या पाण्यानेच
पापण्या ओल्या चिंब हाती
दिवसभर सूर्य ओकतो आग ।
बाळ भुकेने झोपतच नाही
हवेने दिवा विझूनी जाई
बाळ रडून हुंदका देई
पाण्यावाचून तहान विरून जाई
काय सांगू बाई
रडून पापण्या कोरड्याच राही
झाडाझुडपाला पालाच नाही
करपली काळी आई.
करपली....
किशन पवार
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment