माणूस
माणसाला नाव नाही,
माणसाला गाव नाही;
माजल्या बाजारपेठा,
माणसाला भाव नाही;
फाटलेल्या ढुंगणाला
संस्कृतीची हाव नाही;
तंगड्या स्फोटात गेल्या:
धावण्याला वाव नाही;
मोक्ष दिल्ली हाच आता,
जेथ कोणी साव नाही;
शेवटी जळत्या चितेला
रंक नाही, राव नाही!
मंगेश पाडगावकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment