Saturday, 16 January 2010

16-09-2009

१६-०९-२००९
आपल्या मार्गदर्शनानुसार मी पुन्हा माझ्याविषयी माझी प्रतिमा किंवा एक व्यक्तिमत्व उभे करण्याचा प्रयत्न केला. त्यात मी एकांगी विचार केला नाही कारण मला आठवते कि गेल्याच वर्षी मी दसऱ्याला माझ्या जुन्या गल्लीत गेलो होतो.अर्थात प्यायलेल्या अवस्थेत पण तेथे माझे उस्फुर्त स्वागतच झाले.
९/१० वर्षापूर्वीही माझे पिणे गृहीतच धरलेले होते.पण त्यावेळी किंवा आजही मी 'सभ्य' या चौकटीतच बसतो.पण या ९/१० वर्षात अतिमद्यपानामुळे कदाचित माझ्याच मनातून मी उतरलो आहे.मुद्दा तो नाही, मुद्दा असा आहे कि, दोन्ही परिस्थितीमध्ये एकंदरीत समाज,व्यक्ती माझ्याकडे चांगली व्यक्ती म्हणूनच पाहत होते,पाहतात पण माझ्या एकांगी विचार करण्याच्या पद्धतीने मी अधोगती व्हा मार्गाला लागलो असे वाटते.
कारण मला जे म्हणायचे ते मला पूर्ण समजते.ते आत्मकेंद्री,दुसर्याला तुच्छ लेखणारे किंवा इतरांच्या भावनांचा विचार न करणारे आहे.उदा: मी मागच्या qt मध्ये 'सावरी' च्या झाडाचे उदाहरण देऊन म्हणतो,"कांही माणसे जन्मतःच निरुपयोगी असतात.त्यांचा जन्मच दुसऱ्यांना दु:ख देण्यासाठी झालेला असतो."
त्याचवेळी मी असेदेखील रडगाणे गातो कि,"माझ्यावर अन्याय झाल्याची भावना माझ्या मनात आहे." त्यावर जर उदा:तुम्ही असे सांगितले कि,"कारे बाबा,कांही माणसे अन्याय करण्यासाठीच जन्माला आलेली असतात आणि कांही अन्याय सहन करण्यासाठीच जन्माला आलेली असतात."यावर माझ्या मनात पुन्हा 'अढी' निर्माण झाली असती!
सांगण्याचा उद्देश असा कि,समजा मी विहिरीत,पाण्यात पडलोय,मला पोहायला येत नाही,तुम्ही सांगितले,"अरे,हातपाय हलव,म्हणजे वाचशील."यावर मला माहित आहे कि,हातपाय हलवले नाही तर मी मरणार पण केवळ दुसरा कोणी हे सांगतोय म्हणून मी हातपाय हलवणार नाही.हि वृत्ती,किंवा या वृत्तीला काय बरे म्हणता येईल?
तसेच संस्कार किंवा सामाजीकरण हे जाण आल्यानंतर त्यात मी योग्य बदल घडवून आणू शकत होतो,सांगत हा माझा choice होता हे देखील कळते पण अजून कांही अस्पर्शित कंगोरे राहिले आहेत ते पुढील qt मध्ये लिहीन.
नमस्कार,
very good , आपण पुढे नंतर बोलूया.
संगीता जोशी मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....