मी मागेच याविषयी लिहिले होते.पण याबाबत संगीता मॅडमशी बोला असे लिहिल्यामुळे ते टाळले.सध्यातरी इथे राहून नेमके आपल्या समस्या तरी काय आहेत हे थोडेफार समजू लागले आहे.
त्यातून मी दिवाळीत भावाशी बोललो तर भाऊ म्हणाला कि, 'ठीक आहे पण तू उस्मानाबादला जाशील तर कदाचित परत दारू चालू होईल.'
मी म्हणालो, 'अरे, तसे पहिले तर गाडीची पाटी बघितल्यापासून मला क्रेव्हिंग,ऑबसेशन, वगैरे जे काय म्हणतात ते सगळं सुरु होतं बघ!पण शेवटी जावं तर लागेलचना! तिथे माझे कुणी न पिणारे मित्र वगैरे नाहीत.बोलणारा वगैरे असेल तर तो देखील दारूडाच, कामाचे ठिकाणी सहकारी दारूडेच!मग कुणाकुणाला टाळणार?
याआधी मला अगदी कुणालाही बोलायला, भेटायला जाण्याआधी दारू प्यावी लागत असे.त्याच्याशिवाय मी दोन शब्द धड बोलूही शकत नव्हतो.याविषयी मी विचार केला, तशी माझ्या व्यसनाची सुरुवात जरी कमी वयात झालेली असली तरी अठरा-एकोणीस वयापर्यंत मी ज्याला 'सोशल'म्हणू शकू या पातळीवर फक्त रात्री किंवा कधीतरी दिवसा पीत असे.या काळात क्रिकेट मंडळ, सार्वजनिक मंडळाच्या कामासाठी नेते, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस स्टेशन ला जावे लागत असे.तेथे ,'अरे, याला बरोबर घ्या, याला चांगलं बोलता येतं' असं म्हणत.मग नंतर २-४ वर्षात दारूमुळे मी एकटा पडत गेलो.बोलणे वगैरे संबंध संपला.कुणाला बोलायला, कुणात मिसळायला नको वाटते, किंवा दारू पिल्याशिवाय बोलावे वाटत नाही.
गेल्यावर्षी 'मुक्तांगण' मध्ये डॉ.नाडकर्णी यांनी सर्व पेशंटना वेळ दिला होतं, मी माझी समस्या त्यांना सांगितली, ते म्हणाले, बरेच वर्षे दारू पिल्याने असे होते.ते कायम नसते.याला 'सोशल फोबिया' असे म्हणतात.यावर डॉ.गाडेकरांनी कांही औषधे दिली, पण मी दारू प्यायला सुरुवात केल्याने ती औषधे घेतली नाहीत, तशी गरजही वाटत नाही.कारण दारू असल्यावर औषधाची गरजही वाटत नाही!नसतेही!
तर या पार्श्वभूमीवर आपल्याला नेमकं काय होतंय हे कळणं आणि सद्यस्थितीत नोकरीच्या ठिकाणी काय परस्थिती आहे हे ठाऊक नाही.तेंव्हा मॅडमच्या सल्ल्याने तेथे जाणे ठरवले आहे.
कारण याआधीच qt मध्ये लिहिल्याप्रमाणे मी कधी काहीच काम केले नाही किंवा करायची इच्छाच नसेल तर काही उपयोग नाही.दोन बाबी तर माझ्याबाबतीत स्पष्ट आहेत...
याआधी देखील आणि आताही मी इथे 'मला बरे वाटावे म्हणून आलो आहे' त्यामुळे माझ्यादृष्टीने सध्या जरी आर्थिक दृष्ट्या मदत करीत असले तरी समजा उद्या मी दुसरे क्षेत्र निवडले, त्यात अपयश आले, किंवा परत स्लीप झाली तर ते मदत करतीलच असे नाही,त्यामुळे अनिश्चिततेचे तत्व जरी गृहीत धरले तरी यापुढे मला 'आर्थिक अवलंबित्व 'नको आहे.त्यामुळे 'सोब्रायटी' टिकवणे हे गृहीत धरूनच माझ्यादृष्टीने 'आर्थिक सुरक्षा' महत्वाची वाटते.
नमस्कार,
आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं असणे हि फार महत्वाची व स्वतःला छान वाटणारी गोष्ट आहे.त्यामुळे ते एक [अनेक ध्येयांपैकी] ध्येय ठाव्ने फार संयुक्तिक आहेच.त्यानुसार कांहीतरी प्लांनिंग करणे.
तुम्ही जे म्हणताय कि बाहेर पडल्या पडल्या प्रलोभने आहेतच पण तुमची जी मनातली, कल्पनेतली भीती
[स्वतःच्या सोबर राहण्याची] आहे.
कदाचित वास्तवात एवढी नसेलही, विचार करून सांगा.
तुम्ही जे उस्मानाबाद बद्दल लिहिलंय त्याबद्दल एक छान गोष्ट मला माहित आहे.भेटलो कि आठवण करा, मी सांगेन!
वैशाली जोशी मॅडम
No comments:
Post a Comment