Friday, 22 January 2010

16-10-2009

१६-१०-२००९
आज पुन्हा एकदा सर्व qt मध्ये मांडून झालेले मत मी पुन्हा एकदा मांडतो आहे कि, मला जसे आज सकाळी मॅ
डम आणि उमराणी सरांनी सांगितले तसे आम्ही,[मी] वास्तवात कधी रहात नाही.
मी तेच म्हणतो, मला वास्तवाचे भान असते पण, दारू=पलायनवाद, दुसरे कांही नाही. हे अजब समीकरण आहे. जेंव्हा जेंव्हा मी स्वतःबद्दल लिहिले, तेंव्हा मला माझ्या उणीवा स्पष्ट दिसतात पण त्यावर काम करण्याऐवजी[माझ्या मते, उणीवा एकदम काढल्या नाहीत, तर त्या योग्य रीतीने वापरल्यास गुणदेखील होतील.] पण तेव्हडे शहाणपण, संयम माझ्याकडे नसते.वास्तवापासून चटकन दूर होण्याचा एकमेव उपाय, मार्ग म्हणजे दारू! मग कुणीही , कितीही सांगो [मला ते पटलेले असते. पण कृतीची भीती किंवा तयारी नसते.] कदाचित त्यामुळे मी दारूकडे चटकन आकर्षितहोतो.
कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो यावर माझा विश्वास नाही.वेळेवर व्हावी असे वाटणे माझ्यासाठी घातक ठरले आहे.हे मला कळते पण आता लगेच सावरलो नाही तर पुढे काय? याची चिंता, चिंतेतून अनिश्चिततेची भीती
याचा विचार नकोसा वाटून जो कांही सावरण्याचा वगैरे वेळ असतो तो देखील मी घालवला आहे.त्यामुळे दारूला भिऊन का होईना तीन महिने नीट राहता आले, स्वतःकडे थोडे पाहता आले से वाटते.निदान
दुसऱ्याचे ऐकल्याने [मला पटणारे] कारण न पटण्यासारखे असे कांही नाहीच याचे कारण मी १ ल्या qt मध्ये जेंव्हा 'सरेंडर' विषयी लिहिले होते, त्याचा उल्लेख येथे करावा वाटतो कि, लहान मुल जसे [तान्हे मुल जसे,] कुणाच्याही खांद्यावर निर्धास्तपणे मान टाकते,त्यात त्याला कसली भीती, शंका वगैरे वाटत नाही कारण त्याला तेवढे कळत नाही, किंवा त्याचा सर्वांवर विश्वासच असतो.तो निर्धास्तपणा किंवा 'सरेंडर' ची ती भावना माझ्यात राहावी हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो.त्यामुळे अस्थानी शंका उपस्थित करण्याचे प्रयोजनच नाही.असो.
तर पुन्हा एकदा मी माझ्या 'सेल्फ' विषयी तपासणी करेन.
आपणास, करकरे
मॅडम, तसेच सर्व 'कृपा' परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेछ्या!

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....