
शापच आहे मला संगमरवरात स्वप्न
लपवून ठेवण्याचा.
पांडुरंगाच्या चरणाला प्रक्षाळन करणारी
चंद्रभागा मी पाहिली नाही, आत्मसंवादाची
हीच प्रचीती आली माउलीच्या उरावर
पाय ठेवताना.
शापच आहे मला संगमरवरात स्वप्न
लपवून ठेवण्याचा.
प्राणांचे मोल देऊन मुक्ती विकत घेत
असतो मी; देहूच्या बाजारात अभंग
विकणाऱ्या तुकारामाप्रमाणे-शापच आहे
मला संगमरवरात स्वप्न लपवून ठेवण्याचा.
चाहुलवेड्या वाटूलीच्या प्रतीक्षेत चरणगंधाच्या
स्मृतीचे फुल उमलताना पहिले नाही मी,
वाचली नाही सांद्र तमागारात काजव्याने
रचलेली प्रकाश गाथा; पण फुटलेल्या
डोळ्यांच्या निरांजनात तुला ओवाळणारी शिळा
पहिली आहे रे....
शापाचा आहे मला संगमरवरात स्वप्न
लपवून ठेवण्याचा.
ग्रेस
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment