Saturday, 30 January 2010

16-11-2009

मला इतरांकडून उत्तरे नको असती तर लिहिण्याचा तरी प्रपंच कशाला केला असता? मात्र बोलताना संदर्भ नीट नसतात म्हणून कदाचित असेल...असो.
मी नौकरी विषयी लिहिल्यावर आपण जे लिहेले होते कि, बौद्धिक पात्रता वगैरे तर माझे सगळे नाकारण्याच्या दिशेने चालू असते. कारण खरे पाहता, एवढेतर सामान्यत: सातवी पास मुल्ल्गादेखील लिहू शकेल, त्यात कांही विशेष नाही.
मागे qt मध्ये हाच मुद्दा लिहिला तेंव्हा संगीता मॅडमनी सांगितले कि, एकंदर तुम्हाला दुसऱ्याकडूनही आपली नालायकी वदवून घेऊन 'बाटलीत स्वतःला बंद करून घ्यायचे आहे.'
हाही मुद्दा कांही अंशी खरा आहे पण जेंव्हा आज पुन्हा मी वारंवार qt मध्ये लिहितो तोच मुद्दा, कि मला भावना, संवेदना यापेक्षा बेसिक नीड्स या महत्वाच्या वाटतात.यावर rebt च्या तासात करकरे
मॅडमनी मुलभूत गरजा-सुरक्षा-ओळख-आत्मसन्मान-आत्मज्ञान; असा त्रिकोण दाखवला.
त्या त्रिकोणात आज तरी मला बेसिक नीड्स चं महत्व जास्त आहे.बौद्धिक पात्रता नाकारूनही जेमतेम आहे हे मान्य पण सध्या त्याने पोट भारत नाही हे खरं आहे.त्यामुळे मी त्याला प्राथमिकता दिली तर त्यात कांही गैर आहे असे मला वाटत नाही. शिवाय स्वतःची निर्णयक्षमता असली तरीही त्यावर विश्वास ठेवणे अवघड वाटते.
भावाने यासंदर्भात संगीता
मॅडमशी बोलून काय ते ठरवू असे सांगितले आहे.तरी स्वतःवर विश्वास नाही अशी सद्यस्थिती आहे.पत्रकारीतेसंदर्भात संजय मोघे यांना बोललो ते माहिती देईन म्हणाले.
पण परत एकटा पडलो तरीही बेसिक नीड्स आता आवश्यक वाटतात. परत एक छोटी गोष्ट...[कारण कुठेतरी, कांहीतरी वाचलेलं असतं, दारूमुळे सकाळचे दुपारी आठवत नाही, किमान तेवढाच व्यायाम!] तर,एक 'जू' नावाचा चीनी तत्वज्ञ नदीकिनारी मासे पकडत बसलेला असतो.तेथे सम्राटाचा राजदूत येतो.तो जूला सांगतो कि, आपणांस सम्राटांनी पंतप्रधानपदी नियुक्त केले आहे.
जू क्षणभर थांबतो, त्याला विचारतो, 'तू सम्राटांचे संग्रहालय पहिले आहेस काय? तेथे एक मोठी ढाल आहे. ती कासवाच्या पाठीची आहे.तो कासव जर आज हयात असता तर, त्याला संग्रहालयात राहायला आवडले असते कि, दलदलीत?'
राजदूत उत्तरतो, 'दलदलीत' जू त्याल म्हणतो, 'तर मग आता तू आपल्या सम्राटाना सांग कि, मी इथे मुक्त मासे पकडत दलदलीतच बरा आहे.'
माझ्याबाबतीत विरोधाभास असला तरीही बेसिक नीड्स ज्याला दलदल म्हणू तेथे मिळत असतील तर मगच बाकी बौद्धिक,भावना, संवेदना वगैरेना पुन्हा अर्थ येतो!
कदाचित इतकी वर्षे दारू पिऊन पिऊन डोके बधीर झाल्याने कांही असंदर्भ लिखाण होत असेल तर क्षमस्व!

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....