Monday, 25 January 2010

रंग खेळतो हरी


आज गोकुळात रंग खेळतो हरी;
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी!

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो,
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवुनी रंगुनी गुलाल फासतो...

सांगते अजूनही तुला परोपरी!


संग श्यामसुंदरास काय जाहले?
रंग टाकल्याविना कुणा न सोडले;
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले!

एकटीच वाचशीस काय तू तरी!



त्या तिथे अनंगरंगरास रंगला:
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला;
तो पहा मृदंग मंजिर्यात वाजला...

हाय! वाजली फिरून तीच बासरी!


सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....