
आयुष्य बेचिराख तरीही मजेत मी!
आली व्यथा कवेत, व्यथेच्या कवेत मी!
आताच तो उदास लपंडाव संपला;
थोडे उजाडताच....मिळालो सचेत मी!
झाला जमा अखेर निराधार हुंदका;
आता नसो खुशाल कुणाच्या कवेत मी!
आता कसा निवांत सुखनैव सोसतो,
घेतो मधून श्वास फुलांच्या हवेत मी!
येती तशी अजून घराची निमंत्रणे;
रस्त्यावरी उभाच मनाच्या सभेत मी!
माझा मी उगीच पणा प्राण लावला;
गेला चुकून ताल तरीही समेत मी!
सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment