
एकमेकांना कसे हे चावती कुत्रे
हांडकांसाठी कसे हे भांडती कुत्रे
हालती या शेपट्याही नेमक्या वेळी
हे जरी संतापलेले वाटती कुत्रे
जन्मले कुत्रे कधी का गर्जण्यासाठी?
लोकहो, ऐका जरा-- हे भुंकती कुत्रे!
का करावी माणसांनी एवढी चिंता
एकमेकांना जरी हे फाडती कुत्रे
जी मिळे ती घाण खाती रोज कोठेही
मात्र दिल्लीचाच साबू मागती कुत्रे
प्रश्न हा जो तो विचारू लागला आहे--
" पाय कोणाचे आता हे चाटती कुत्रे?"
हाय, कुत्र्याचा निघाला शेवटी पंजा
नाव सिंहाचे जरी हे सांगती कुत्रे
हा जुना कुत्रा असो वा तो नवा कुत्रा
शेवटी कुत्र्या प्रमाणे वागती कुत्रे!
सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment