अभिप्रायाबद्दल धन्यवाद; पण आज थोड वेगळं [भंकस] लिहिणार आहे.त्याबद्दल क्षमा असावी.किंवा वाचूही नये कारण मी थोडाफार योगायोगावर विश्वास ठेवतो, सकाळी इनपुटला येण्याआधी बिडीझोन मध्ये कुणीतरी पंकज उधासची एक गजल गुणगुणत होता , मी आणि किशोभाई तिथे बसलो होतो, खरेतर मी पंकज उधासचा खूप चाहता आहे.पण आज थोडी फिरकी घ्यावी वाटली.
मी म्हणालो, 'किशोरभाई, हि गजल मी निदान पंधरा वर्षांपासून ऐकत आहे.पण याचा जो शेवटचा 'शेर' आहे, तोच, त्याचा मतितार्थ, आपण तीन महिने इथे इनपुट आउटपूट मध्ये ऐकतो.पण मग इतक्यांदा ती गजल ऐकून आपण सुधारलो नाही, तर मग आता कसे सुधारू?
किशोरभाईनां मी थोडे स्पष्टीकरण दिले.प्रथम त्या चार ओळी अशा...
कैसी लत कैसी चाहत कंहा कि खता [२]
बेखुदी मी ही अन्वर खुद ही का नशा
जिंदगी एक नशे के सिवा कुछ नाही [३]
तुमको पिना न आये तो मी क्या करू?
मी म्हणालो, 'लत म्हणजे habit ,चाहत म्हणजे likeing ,खता=guilt ही सर्व समर्थने आहेत.बेखुदीमे ही अन्वर [शायर] खुद ही =self का नशा;
मग परत एकदा आपण आपल्या सेल्फ बद्दल जागरूक नसतो हेच तो सांगतो.
हे ते एकदा कळले कि पुढे [पंकज उधसच्या गाण्याची शैली म्हणूनही कदाचित पण परत तीन तीनदा] जिंदगी एक नशे के सिवा कुछ नही.
मग इतके कळूनही तुम्हाला जगता येत नसेल तर;तुमको पिना न आये=जिना न आये तो मैं क्या करू?असा सवाल तो करतो.
मग इथेदेखील सकाळ-दुपार तेच तर सांगतात कि सेल्फ इनट्रोस्पेक्ट करा म्हणून!
मग किशोरभाई तुम्ही आम्ही तेंव्हाच का नाही सुधारले?'
गंमतीचा भाग सोडला तरी हा 'अन्वर' याला थोडेच सिग्मंड फ्राईड, अल्बर्ट एलीस ठाऊक?तरीही तो सहजतेने गजल लिहून सांगतो, आम्ही वर्षानुवर्षे निव्वळ गुणगुणतो पण मतितार्थ सोडा पण एखाद्या 'शेर' चा [संपूर्ण गजल तर दूरच!] अर्थ सुद्धा कधी लावावा वाटत नाही.किंवा तो दारूपासून दूर जात असेल तर मग विषयच बाद; अशी कांहीशी अवस्था, मानसिकता आहे, त्यात बदल घडवण्यासाठी 'भंकस' का होत नाही पण लिहिणे आवश्यक आहे.
नमस्कार,
ह्या भंकसबद्दल मनापासून अभिनंदन!ह्याला भंकस का म्हणता आहात?
तुम्ही स्वतःला कमी लेखणं जरा कमी करता का? कदाचित हे व्हीजुअस सर्कल असेल कि गेली कांही वर्षे नीटपणे कांही जमलं नाही; न्यूनगंड व तसं वाटतं म्हणून challenge घेणं नकोच असं वाटून परत निष्क्रियता.तर आपल्याला हे वर्तुळ छेदनं जरुरी आहे.
तुम्हाला काय वाटतं?
वैशाली जोशी मॅडम
No comments:
Post a Comment