
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला
सुगरीन सुगरीन
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा संगाती
मिये गन्यागंप्या नर
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा!
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुला देले रे देवानं
दोन हात दहा बोटं?
बहिणाबाई चौधरी
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment