कृतीशुन्यता हा माझ्याबाबतीत मोठा दोष आहे हे अगदी मान्य केले आहे.कारण मी पहिल्यांदाच qt मध्ये लिहिले त्याप्रमाणे मी कधी कांही केलेच नाही, त्याचेही समर्थन मी दारू पिण्यातून वेळच मिळाला नाही असे करत असे.
समजा कांही काम वगैरे असेल तर मी आधीच म्हणतो, मला त्यातले कांही कळत नाही, मी कधी केले नाही.समोरून उत्तर येते कि जे मला अपेक्षित असते, 'बऱ्याच गोष्टी आपण आयुष्यात पहिल्यांदाच करतो!दारूही पहिल्यांदाच प्याली होती!यावर मी काहीतरी वेळ मारून नेतो.टाळतो.
दुसरी माझी समस्या म्हणजे खरेच मला काही कळत नाही हे मी परोपरीने सांगून देखील लोकांना पटत नाही.माझ्याजवळ ना धड व्यवहारज्ञान आहे न संवाद साधण्याची कला. हे मी खुल्या दिलाने मान्य करतो.त्यात मला लाज वाटत नाही.पण जेंव्हा मी खरेच काही सांगत असतो ते देखील पटत नाही तेंव्हा मात्र त्रास होतो. एक छोटासा प्रसंग..
मी इथे येण्याआधी औरंगाबादला लहान बहिणीकडे होतो.तिथे माझे दारू पिणे परत चालू झाले.मी एकटा राहण्याचा निर्णय घेतला पण दारू इतकी जास्त होत होतो, किंवा सहनही होत नव्हती तेंव्हा मी भावाला फोन करून इथला पत्ता आणि फोन दिला.इथे नाव नोंदविण्यास सांगितले, त्यानंतर साधारण शनिवारी मी इथे दाखल होणार होतो, पण त्याआधी मी स्वतः आता दारू प्यायची नाही असे ठरवले.मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा पिलो नंतर झोपेतून उठल्यावर बहिणीने जेवणाबद्दल विचारले, तेंव्हा खरेतर मी दारू थांबवण्याचा विचार, ठामपणा, पिण्याबद्दल परत परत य्णारी अपराधी भावना,नैराश्य अशा मन:स्थितीत होतो.मला खरेच दारू प्यायची नव्हती पण क्रेव्हिंग किंवा शारीरिक त्रास यामुळे मी परत परत पीत होतो.मी बहिणीला सांगितले कि, 'मी जेवणार नाही,मला त्रास होतोय, डिप्रेशन आल्यासारखे होतेय', यावर बहिण हसून म्हणाली, 'तुला? आणि डिप्रेशन? तू अरे सगळ्यांना डिप्रेशन आणशील!'
आता यावर काय बोलणार? तर नैराश्य, वैफल्य,राग या सर्व भावना अगदी टोकाच्या मला येतात पण मी हसून खेळून त्या टाळतो त्यामुळे रागातील आक्रमकता घरात दिसते, तसे इतर भावनांच्या बाबतीत होत नाही.किंवा त्या कुणी ओळखाव्यात आणि मला कुणाची सहानुभूती वगैरे असावी असे मला कधी वाटत नाही.हे चुकत तर नाही ना? कारण मी फक्त राग दाखवतो पण इतरवेळी 'निर्लज्जम सदासुखी' यावृत्तीने असतो.
नमस्कार,
तुम्हाला याबद्दल अवेअरनेस आहे, जाणीव आहे हे खूप चांगल आहे कि वाटणाऱ्या इतक्या आहेत पण इतरांना फक्त राग दाखवता.इतर भावना ऐदर सप्रेस करता [दडपता] किंवा मास्किंग [वेगळंच कांहीतरी दाखवता] तर हे विशेष बरे नाही.कारण इथे प्रामाणिकपणा सुटतो.
नैराश्य,वैफल्य येतं असं जे लिहिलं आहेत, त्याचं कारण काही सापडलं आहे का? नेमाने सलग करीयर न झाल्याने न्यूनगंड वाटतो का? आत्मविश्वासात फरक पडला आहे का?
तुम्ही स्वतःला नेहमी डिसऍडरेड करता, मला ते विशेष आवडत नाही.कारण मला तसं वाटत नाही.पण तुम्ही स्वतःला माफ केलेलं नाही का?इथे राहताना त्या दिशेने जरूर self talk तसा करा.स्वतःला इन्फ़िरिअर समजणारं वाक्य शक्यतो बोलयचं नाही.[मनात, बाहेर] असं दंडक करा.सेल्फ इमेज मध्ये कांही फरक पडतोय का ते बघा.
एक एक्सरसाईज करून बघा.
इथून बाहेर गेल्यावर तुमच्या विविध रोलप्रमाणे जबाबदारी कोणती कोणती आहेत ते लिहून काढा.
वैशाली जोशी मॅडम
No comments:
Post a Comment