Sunday, 31 January 2010

25-11-2009

मी, तुम्ही रजेवर असतानाच विचार केला होता, याविषयी लिहिले होते, आणि भावाशी बोललो होतो, कि, हे सर्व शिक्षण वगैरे बोलायला ठीक वाटत्ते, राहिला प्रश्न पत्रकारितेचा वागैरेचातर ते त्यालाही माहितीत आहे कि, मी उस्मानाबादला हे डिग्री न घेताही करू शकतो कारण माझे मित्र असे कांही कोर्स न शिकतादेखील लोकमत/सामना सारख्या दैनिकात उपसंपादक आहेत. ते मला बोलावतात देखील, तो प्रश्न वेगळा मात्र माझी व्यावहारिक अडचण अशी आहे कि, मला सध्याच्या नोकरी विषयी आहे/नाही माहिती नाही.
दुसरी बाब नकारात्मक असली तरीही अशी कि मला, आता 'सोब्रायटी' पेक्षा आर्थिक स्थिरता महत्वाची वाटते.त्यासाठी प्राथमिकता मी नोकरीला देणार आहे.कारण घरच्यांचा अनुभव कांही ठीक नाही.त्यामुळे उगाच हातचे सोडून आणि दारूचा बागुलबुवा करून काही अर्थ नाही असे वाटते.
तिसरा मुद्दा असा कि, मला जो आर्थिक सुरक्षेशी निगडीत आहे तो अस कि, माझे वैयक्तिक पैसे असतील तर मला कुठेही लॉजवर वगैरे स्वतंत्र राहू शकेन, राहता येईल. पुन्हा स्लीप, शारीरिक आजार यासाठी मदतीसाठी यावे लागणार नाही.अस एक हेतू आहेच.
चौथा मुद्दा असा कि, घरच्यांचा प्रश्न येतो तेंव्हा मी त्यांना काय किंवा त्यांनी मला काय उगाच एकमेकांना दोष देण्यापेक्षा वेगळे झालेले बरे.कारण शेवटी प्रत्येकाला आपले आपले आयुष्य असतेच.
राहिला मुद्दा जसे वैशाली मॅडम सांगतात तसे बौद्धिक वगैरेचा तर पण त्याने पोट भारत नाही.तसे काही कौशल्य माझ्यात नाही. तेंव्हा एकटे राहणे अवघड नाही आणि जिथे २० वर्ष काढली तिथेतर मुळीच नाही.
मी इथे येण्यामागे स्वतःसाठी वेळ देणे, आपले काय चुकते? आपण अशी दारू का पितो? आपला दुसऱ्यांना त्रास का होतो? हे सर्व पहिले, कारण नुसतेच असे व्यसनमुक्ती केंद्रात राहून नंतर घरून कांहीच प्रतिसाद मिळत नाही.तेंव्हा तीही डीपेन्डसी सोडावी हा निर्णय घ्यावालागतो कारण मी माझे प्रमाणपत्रे कुठे दारू पिऊन घालवले नाहीत, तर घरातच गहाळ झाली आहेत.
तेंव्हा या सर्वांचे ओझे तरी मी का वाहावे? मला राहण्यासाठी एक बॅग पुरते! त्यांच्याकडे राहिलो तर ते केंव्हाही हेच करतात, करू शकतात म्हणून दारूपासून लांब राहाचे ते तर पाहूच पण परत गड्या आपला गाव बरा!कारण सर्व गोष्टी गृहीत धरल्या तरी हे बोलायला, वरवर चांगले वाटते, पण मदतीची वेळ आली कि, अनुभव फारसा चांगला नसतो.त्यामुळे तिथे जास्तीत जास्त बडतर्फीची शक्यता गृहीत धरले तरी अपील करावे लागेल.त्यामुळे जास्त डोके चालवायचे नाही असे ठरवले आहे.
सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात पण मी कुठेही जाण्यामागे कांही उद्देश असतात, त्यामुळे जसा दारूचा त्रास होऊ लागला म्हणून मी इथे आलो, तसा सोलापूरला जाण्यामागेही एक उद्देश होता कि, मला 'मटका' थोडा कलतो, आणि पोलिसांची भीती वाटत नाही या जमेच्या बाजू असल्याने तिथे काम करावे म्हणून गेलो तर, 'आचारसंहितेमुळे' सर्व थंड होते.म्हणून परत औरंगाबादला आलो, तिथे परत दारू चालू झाली. उगाच बहिणीला त्रास नको म्हणून भावाला इथला पत्ता दिला.


No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....