Monday, 25 January 2010

28-10-2008

२८-१०-२००९
काल ए.ए.मिटींगमध्ये शेअरिंग ऐकल्या त्यात एक माझ्या अनुभवांशी मिळती-जुळती वाटली.रात्री झोपताना थोडा विचार केला.कारण याआधीही माझे ए.ए. विषयी फारसे चांगले मत नव्हते पण हळूहळू ते बदलत गेले.मी एक दारुडा आहे हे जरी मी मान्य केले असते तरी १० वर्षापुर्वीच आजचे चित्र थोडे वेगळे दिसले असते.

मी फर्स्ट इयरला असताना सहज म्हणून साहित्यसम्राट तात्यासाहेब उर्फ न.ची.केळकर यांचे रसशास्त्रावारचे एक पुस्तक वाचले होते.त्यात 'कॅथर्सीस' चा सिद्धांत होता.तो ए.ए.च्या माध्यमातून आज पटला!
त्यावेळी त्यात एक शब्द खटकत होता.मी म्हणत होतो, अनुभवांची पडताळणी होते, प्रत्यय येतो, भावनांचे विरेचन होते इथपर्यंत ठीक आहे.पण खटकणारा शब्द म्हणजे 'पुन:प्रत्ययाचा आनंद' मी म्हणायचो, समजा एखाद्याची आई मेली, माझीही मेली त्यात कसला आनंद? पण त्या वेळी जे कळले नाही ते आज पंधरा वर्षांनी कळले, कारण ए.ए. मध्ये माझ्या दृष्टीने शेअरिंग करणारा समोरचा सोबर मनुष्य [मग तो किती काळ सोबर आहे त्याला महत्व नाही] पण सांगतो तोच माझा अनुभव असेल याची जर पडताळणी झाली आणि आज तो भावनिकदृष्ट्या त्याच्या त्याच्या विश्वात ठामपणे उभा असेल[आर्थिक भाग कदाचित वेगळा असू शकतो]
तर मलादेखील विश्वास येतो कि मी देखील उभा राहू शकेन.कदाचित त्याच्या मार्गांनी अथवा अन्य पर्यायी मार्गावर श्रद्धा ठेऊन पण पर्याय नक्की असू शकतात हे पटते.
याकरिता 'बोअर' जरी वाटले तरी निश्चितच ऐकावे वाटते.'असे' वाटणे हि देखील माझ्यामते माझ्यात होत असलेल्या सुधारणेचे एक पाऊल आहे.

मी बाहेर गेल्यावर मिटिंग करेन कि नाही हि बाब अलहिदा, पण इथे मात्र आता "कंटाळा" येत नाही एवढे खरे!
नमस्कार,
तुमच्यात होणाऱ्या सुधारनांबद्दल मनापासून अभिनंदन! तुमच्या बोलण्यातूनही हे जाणवते कि, तुम्ही विचार नक्कीच करत असता.[स्वतःच्या विचारप्रक्रिया,कृतींबद्दल]

पुढे काय करायचे ह्याबद्दल विचारांमध्ये clarity आली आहे का?संगीता मॅडमशी बोलताहात ना? फक्त थेअरी, विचार मिळून कांही उपयोग होत नाही.कुठेतरी त्याचं application असणे हे खूप गरजेचे आहे.आपल्यात बदल होतो आहे हे आपल्या कृतीतून व इतरांशी आपलं जे वर्तन असतं, त्यातून जाणवलं तर त्याचा उपयोग आहे.
वैशाली जोशी मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....