Sunday 31 January 2010

23-11-2009

शनिवारी भाऊ आला होता काय बोलणे झाले माहित नाही.पण एक मात्र निश्चित कि सर्व सकारात्मकच असेल.
पुन्हा एकदा सहज विचार करताना प्रामाणिकपणे वाटते कि आता दारूपासून लांब राहणे जमेल, इतके दिवस उगाच आजारीपणा,अनामिक भीती, याला घाबरून गेलो, पण लगेच वाटते कि नाही..
कारण सरकारी नोकरी आज सहजासहजी लागत नाही, त्यात स्थिरता आहे.उगाच दारूचा बाऊ करण्याची गरज नाही, वाटते काहीही करून परत जावे.पण अंतस्थ हेतू परत आर्थिक कारनापाशी घोटाळताना दिसतो. 'मी दुसरे कांही दारू शकत नाही' हि भीती [खरी आणि उगाचही कदाचित असेल] पण आहे. व्यावहारिक दृष्ट्या सरळ साधं आयष्य त्यात आहे मात्र तेथील आता काही माहिती नसल्यामुळे दारूची मात्र भीती वाटते.असो. यासंदर्भात प्रत्यक्ष बोलेन.
आज करकरे मॅडमनी हस्तलिखित अंकासाठी इतरांकडून तसेच माझीही कांही लिखाण जमवा असे सांगितले, मी आणि अजून इतर दोघे-चौघे बरेच लिहू शकतो पण सर्वांनी काहीतरी द्यायला हवे [कारण काहीही लिहिले तरी आपणच वाचणार!] असो.
आता qt मध्ये बोअर करण्याऐवजी मुद्द्याचेच लिहिणार आहे कारण उगाच डोक्याला ताप नको! तुमच्याही आणि माझ्याही!
नमस्कार,
हे बरं झालं कि, तुमच्या qt मुळे आमच्या डोक्याला ताप होतो असं तुमचं मत आहे.
तुमच्या आयुष्याबद्दल इतर कुणीही काहीही निर्णय घेण्यापेक्षा तुमच्या मनात काय प्लानिंग आहे हे एकदा कळलं कि, त्या योजनेतील अडथळे, शक्यता यांचा अंदाज येईल.
आणि सोन्याचा पिंजरा आपल्याला मान्य नसला तरी त्या पिंजऱ्यात येण्या-जाण्याचं स्वातंत्र्य आपल्या उत्तम कृतीने आपण ठरवू शकतो.
आपण प्रत्यक्ष बोलूया.
संगीता जोशी मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....