आज आउटपुट मध्ये जोशी सरांनी एक गोष्ट सांगितली, सांता सिंग नामक काल्पनिक पेशंटची...
तो इथे ९० दिवस उपचार घेतो, सर्व कांही इथले 'रुटीन' पार पडतो, जाताना तो सर्वाना भेटतो.[कारण वेळोवेळी त्याने सर्वच कौन्सिलर्सची मदत घेतलेली असते.] सरानाही तो भेटतो, सर त्याला विचारतात, 'पुढे काय करणार?' तो म्हणतो, 'दारूपासून कसे लांब राहायचे हे मी इथे शिकलो आहे.प्रश्न तो नाही, नोकरी पहिली अथवा पर्यायी मिळेल!'
आता त्याला फॅमिली हवी, छान मुले हवीत, यासाठी सुंदर बायको हवी! पण....
ती 'प्रेग्नन्ट' हवी!!
मी ऍग्रीकल्चर नंतर जोशी सरांना भेटलो. मी त्यान सांगितले कि, 'माझी देखील गोष्ट कांहीशी अशीच आहे, पण हाईट म्हणजे मला बायको 'प्रेग्नंट' च नको तर 'आयत्या लेकराची' हवी! [डिल्हीव्हरी देखील खर्च नको!]
सरांना मी माझा निर्णय सांगितला, त्यांनी त्यासंदर्भात मार्गदर्शन केले.क्षमता व मर्यादा लिहून काढण्यास सांगितले.तसेच मी त्यांना सांगितले कि, मदत जास्त काळ गृहीत धरणार नाही हेदेखील स्पष्ट केले.
इथे आता इतके मार्गदर्शन उपलब्ध असताना माझ्या मनात कांही संभ्रम नाहीत हे खरे, कारण प्रत्येक निर्णय माझ्यादृष्टीने महत्वाचा आहे.तसे इथे काय, घरी काय, किंवा सरकारी अथवा दुसरी नोकरी काय, स्थितीशीलता मला नको आहे.इथे आत्मविश्वास, पर्याय, मदत, मार्गदर्शन इत्यादी कृतज्ञतेचे साधने मला मिळतात म्हणून आधार वाटतो, पण त्यातच स्थितीशीलता येऊ लागली तर कांही अर्थ उरत नाही.कारण घर असो वा रीहॅब सोन्याचा असला तरी पिंजऱ्यात रहायला कोणाला आवडणार? काही काळ स्वतःसाठी देणे आवश्यक आहे. कारण मला सामन्यात: अनिश्चीततेपेक्षा स्थिरता केंव्हाही हवी आहे.कारण विचार करण्याची क्षमता जिथे दारूच्या बाटली भोवती फिरत होती ती किमान आता स्वतः भोवती फिरते आहे.बरेच मुद्दे, गोष्टी सध्या माझ्या हातात नाहीत, शिवाय घरचा प्रतिसाद काय? माहित नाही. अशा वेळी मी काहीही ठरवले, self talk कितीही चांगला असला तरी कांही [जशा आर्थिक] माझ्या हातात हातात नाही.त्यासंबंधी भावाशी आपल्याशी बोलल्यावर पुढील मार्ग दिसेल.
दुसरा महत्वाचा प्रश्न उस्मानाबादचा नोकरीचा कारण इथे कांही करण्यासाठी तिथला निर्णय घेणे आवश्यक आहे कारण सरकारच्या दृष्टीने मी अनधिकृत गैरहजर, बेपत्ता आहे.
त्यामुळे मी आपल्याशी व भावाशी चर्चा करून निर्णय घेईन.
No comments:
Post a Comment