
भारताची राजनीती, समजण्याला लागत
षंढताही खूप, थोडी-थोडकी ना लागते
खूप केला यत्न आम्ही, आम्हास नाही समजली
ना कळो आम्हास, आहे पुष्कळांना समजली
आता कशाची लाज, आता काश्मीरही देऊ अम्ही
काय त्याने भारताचे व्हायचे आहे कमी
दिल्ली जरी गेली तरीही, हार ना आम्ही म्हणू
उंचावूनी लुंग्या स्वतःच्या 'जय जगत' आम्ही म्हणू
बोलू नका कैलास, आम्हा धार्मिकता कोठे नको
गाऊ नका शिवभूप, आम्हा जातीयता कोठे नको
आहे निधर्मी राज्य येथे, अस्मिता नुसती हवी
केंव्हाच ना सांगू अम्ही, का हवी, कसली हवी
नेवो स्त्रिया ओढून, त्यांना केंव्हाच ना शत्रू म्हणू
काय मोठे त्यात, आम्ही मेहुणे त्यांना म्हणू
होता असा अपहार आम्हा, खेदही नाही तसा
नाहीतरी षंढास त्यांचा, उपयोगही नसतो तसा
सांगतो निक्षून आम्हा, शांती हवी शांती हवी
सांगतो तीही पुन्हा, अमुची नको, त्यांची हवी
ऐसे नव्हे या भारती या, बुद्ध नुसता जन्मला
नुसताच नाही बुद्ध येथे, आहे शिवाजी जन्मला
वीरतेची भारती या, ना कमी कधी झाली
आमचा इतिहास नुसता, इतिहास ना झाला कधी
हीच आहे हौस आम्हा, व्हावया समरी शहीद
बाजी प्रभूही आज आहे, आज जो अब्दुल हमीद
बोलला इतुकेच अंती, 'आगे बढो, आगे बढो'
धर्माहुनीही श्रेष्ठ आपुल्या, देशास जो या समजला
जन्मला जो जो इथे तो, वीर आहे जन्मला
अध्यात्मही या भारताचा, युद्धात आहे जन्मला
भाऊसाहेब पाटणकर
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment