
मोबाइलच्या भरवशावरी आता जगतो सखये
'एस.एम.एस.' तू पाठवलेले वाचत बसतो सखये
जे जे करता आले ते ते इलाज सारे केले
विसरायचे तेच नेमके का मी स्मरतो सखये
या पृथ्वीच्या गोलाईवर कसा भरोसा ठेवू
कुठे तरी भेटशील म्हणुनी वणवण फिरतो सखये
नियतीने हि अखेर केली शिकार दो हॄदयांची
विच्छिन्न झाल्या दर्पणात मी तुला शोधतो सखये
आज ना उद्या कधी तरी तू होशील बघ परक्याची
हाच विषारी विचारप्याला प्राशित असतो सखये
इतिहासाची पुनरावृत्ती होते तर मग व्हावी
आशेवरती ह्याच 'इलाही' सखये जगतो सखये
इलाही जमादार
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment