Friday, 29 January 2010

11-11-2009

आज 4th स्टेप विषयी इनपुट/आउटपूट मध्ये चर्चा झाली.तशी मी पहिल्यांदाच उल्लेख केल्याप्रमाणे माझी खुन्नस वगैरे घरच्यांविषयी कि, माझ्यावर अन्याय झाला वगैरे वगैरे पण विश्लेषण केले असता मी मागेच लिहिले तसे कि, मी जबाबदारी घेऊ शकलो नाही
प्रश्न त्या सर्व विश्लेषणात संपत नाही.आज सर्व मुद्दे पुन्हा एकदा लिखित स्वरूपातील वाचले, मनन केले तर, नव्याने एक जाणवले कि, मी कोणाचाच आपला होऊ शकत नाही, हा मानला तर दोष पुन्हा प्रकर्षाने जाणवला.
वस्तुत: अतिमद्यपान हे पलायनवाद आहे हे मलाही कळते, समजते पण कशापासून? कुठपर्यंत? याव्हे उत्तर बऱ्यापैकी qt आणि वर्क पेपर च्या माध्यमातून लिहिली आहेत पण तरी पुन्हा कोणाचा आपला न होणे हे थोडे लिहावे वाटले.कारण माझे तर सर्वच आहेत.मला ते हवेही आहेत.हवे असतात.त्यांच्यावर मी हक्क गाजवतो, पण त्यांना देखील कधी माझी गरज लागत असेल असे मला वाटत नाही.तसे उदाहरणे भरपूर आहेत.[म्हणजे आजपर्यंत तेच {तेच} केले आहे.] त्यामुळे हि टोचणी जास्त लागते.याची जाणीव जेवढी तीव्र तेवढे लांब पाळावे असे वाटते.पण पुन्हा तोच मुद्दा, कुठपर्यंत?
मी लहान होतो तेंव्हापासून पाहू, [वेळेअभावी जास्त लिहिता येत नाही]
उदा: मी लहान म्हणजे १० वर्षांचा होतो तेंव्हा माझा भाऊ ३ वर्षांचा होता, आम्हा दोघांत सात वर्षाचे अंतर आहे.मध्ये दोन लहान बहिणी, तर त्याचे केस वाढलेले होते.फार छान दिसे.मी मनात येई तेंव्हा त्याच्याशी खेळी, त्याला सांभाळण्यासाठी एक बाई होती, एरवी तो मन्ना [ती बाई] कडेच राही.पण मी बाहेर जाताना रडत माझ्याकडे येई.अपेक्षा असे कि, मी खांद्यावर बसवून एखादी चक्कर गल्लीतून मारून आणावी.
उलटपक्षी मी भीती दखवून सतत त्याला परत पाठवी.तसेच वडिलांनी त्याला पैसे दिले असल्यास ते मी काढून घेई आणि मग चक्कर मारून सोडून देई,मागतो रडत बसे.
आज २४ वर्षानंतर देखील परिस्थिती तीच; दवाखाना,व्यसनमुक्ती केंद्र,ह्यात गेल्या वर्ष-सवावर्षात रोख अडीच ते तीन लाख रुपये खर्च झाला आहे.सहल,राहणे, पुस्तके, प्रवास, कपडे वगैरे इतर खर्च वेगळाच.काम करण्याची अपेक्षा नाही.अपेक्षा साधी आणि एकाच कि, प्रकृतीची काळजी घ्यावी,दारू पिऊ नये एवढीच![तीदेखील मला त्रास होतो म्हणून!]
तर एवढी साधी अपेक्षा मी पुरी करू शकत नाही.याची खंत[guilt ] वाटते.म्हणून आपले जरी असले तरी आर्थिक भार त्यांच्यावर येऊ नये म्हणून आपले आहे ते आर्थिक स्वातंत्र्य थोडे स्वार्थी होऊन महत्वाचे वाटते, एवढेच.

नमस्कार,
तुमच्या भावना अगदी समजतात कारण कधीकधी समोरच्याचं खूप चांगलं असणं ह्याचंही ओझं वाटतं.व जरी ते माणूस कांही डिमांड करत नाही तरी त्या चांगुलपणाचं ओझंच होऊन जातं.
लहानपणाचे जे अनुभव तुम्ही लिहिले आहेत त्यातून स्वतःची संवेदनशीलता तुम्हाला जाणवतेय हे कळतंय.पण माझं म्हणणं अनावधानानं ज्या चुका घडतात त्या ठीक पण आता अवेअरनेस आलाय तर त्याबद्दल कांही करता येईल का? माफी मागणं हे छान उत्तर आहे पण मी म्हणेन कि, तसं करून तुम्ही परत प्यायलात तर त्या माफीची गोडी त्यांना वाटणार नाही.उलटपक्षी सोबर राहून [बराच काळ, सतत] जे हे सगळं नुसतं गप्पांच्या ओघात बोलाल तरी हे त्यांना केवढं मोठं असेल.
तर तुम्हाला घरच्यांबद्दल जे कांही वाटतंय ना ते gratitude असेल.प्रेम, बोच, गिल्ट हे सगळं वाटणं तुम्ही सकारात्मक बदल करून वेगळे वागलात तर त्यांच्यापर्यंत नक्की पोचणार आहे.एक कायम लक्षात ठेवणे कि, शब्दांपेक्षा माणूस कृतीतून जे कांही बोलतो ते फार परिणामकारक असतं.तर तसं कांही करून पहा.
दुसरी गोष्ट आर्थिक स्वावलंबनाची, जी मला अगदी पटते व महत्वाची वाटते.कारण इथला अनुभव असा दिसतो कि, खूप मोकळा वेळ व सोब्रायटी एकत्र टिकत नाहीत.तेंव्हा काम करणं हे तर फार जरुरी आहे पण मला असं वाटतं कि, ज्यात बुद्धीला चालना किंवा challenge असेल असा जॉब तुम्ही निवडलात तर तुम्हाला मजा येईल.मग तो आवडीने टिकेलही.कारण तुमच्या पास्ट मधल्या नोकऱ्या व तुमची बौद्धिक पातळी ह्यात मला विशेष मेळ दिसत नाही.तेंव्हा पैशाच्या जोडीने जॉब सॅटीसफॅक्शन मिळेल असा कामधंदा शोधलात तर बरं असं मला वाटतं.
विचार करा व लिहा.
वैशाली जोशी मॅडम






No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....