Saturday 16 January 2010

14-09-2009

१४-०९-२००९
आज डॉ.नाडकर्णी यांचे 'विषादयोग' मधील आत्मस्वीकाराबद्दल २ पाठ वाचले.त्यातून मला मझ्या दृष्टीने 'मी जसा आहे तसा मी मला आवडतो' या प्रयत्न करण्यात मी असलेला पहिला आहे.
कारण जरी प्रत्येक चार पातळ्यांवर आपण सतत स्थित्यंतर करत असलो तरी माझ्या बाबतीत भिडस्तपणा फारतर व्यसनाधीनतेच्या काळात आणि आक्रमकपणा तसेच 'मी आहे' या तिन्ही बाजू वरचढ ठरत होत्या,तरीही त्यातल्या त्यात मी माझा 'I ' मोठा करून इतरांकडे पहात असल्याने साहजिकच इतरांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन i मध्ये होत असे.पण हि अवस्था फार काळ नसे.कारण मी लगेच तटस्थपणे पाहत असे त्यामुळे ०........० त्रयस्थ किंवा किंवा यांत्रिकपणे भावना हाताळणे शक्य असे.जसेजसे यात बदल होत,पण सहसा मी 'मी आहे तसा मी आहे' कडे जाणे प्रसंगानुरूप,व्यक्तीनुरूप आणि विचार,भावनानुरूप पाहीले.
त्यामुळे मागच्या एका qt मध्ये लिहिल्याप्रमाणे लोक मला नाटकी किंवा 'मुद्दाम' करतो असे म्हणतात असे म्हंटले होते,त्याचे स्पष्टीकरण आता मिळाले.कारण खरे पाहिल्यास मला माझ्या मर्यादा स्पष्ट ठाऊक आहेत.त्यामुळे मी हव्या त्या वेळी आक्रमक किंवा भिडस्त किंवा आग्रही असतो.हे वर्तन नाटकी वाटू शकेल.कदाचित त्यामुळेच मला कधी तणावाची विशेष जाणीव नसावी किंवा दारूमुळे तणाव पुन्हा वाढत असून त्याचा उताराही पुन्हा दृच असते 'त्या टाईप' माझ्यात टेन्शन घेण्याची वृत्ती हि इतरांना मुद्दाम 'टेन्शन' देणे हि तर नसेल?असो.
आज थोडेच वाचले, पण समजत आहे म्हणून जास्त लिहिणे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यासारखे नाही काय?
नमस्कार,
प्रवीण,तुमचे qt वाचून माझ्या लक्षात एक मुद्दा येतो कि,ज्या माणसाला विचार-भावना-वर्तन यांची उत्तम चिकित्सा जमते,त्या व्यक्तीला कृतीचा का पाठपुरावा करता येत नाही?
मला वाटतं आपण प्रत्यक्ष बोलूया.
संगीता जोशी मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....