२६-१०-२००९
खर तर आज कांही लिहू नये असे वाटते पण [ २५ मिनिटात माझ्यामुळे टेबलवरील इतरजण बोलतात अशी तक्रार नको म्हणून आज लिहित आहे!]
खरेतर थोडा विचार केला तर नकारात्मक भवना, त्यांची तीव्रता कमी होते.तसेही माझ्या आयुष्यात फार कांही मोठ्या घटना, घडामोडी घडल्या आहेत असे नाही. त्यामुळे कदाचित फारसे कांही वाटतही नाही.मात्र मागे मी qt मध्ये उल्लेख केला होता कि, अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांपलीकडे मी बघू शकत नाही. तेंव्हा संगीता मॅडमनी विचारले कि, हि तुमची अपरिहार्यता आहे कि संवेदना बधीर, बोथट झाल्या आहेत?
यावर आता असे सांगू वाटते कि, संवेदना तर असतातच पण रिकाम्या पोटी तत्वज्ञान गळी उतरत नाही हेहीं तेवढेच खरे!
मी मागे [ मागच्या वर्षी जे कांही दोन-तीन महिने 'सोबर' होतो तेव्हा टीव्ही फार बघायचो.अत्यंत बंडल, बकवास चित्रपट मजा घेऊन घेऊन बघायचो!]
तर तशा एका चित्रपटात नायक नायिकेला प्रेमाच्या भरात म्हणतो, मी तुम्हे सितारोके पार ले चलुंगा, एक नया जहां बसायेंगे वगैरे वगैरे, यावर माझा एक टोन्ट,टोमणा असे ,ते सगळं खरं पण खाणार काय? राहणार कुठं?
वास्तवात असं कांही नसतं त्यामुळे संवेदना वगैरे नंतर प्रथम मुलभूत गरजा हेच खरे. माझ्याबाबतीत हीच चूक मी केली दारू, एकटेपण यामुळे आहे ती नोकरी थोड्याफार मालमत्तेच्या जीवावर सोडण्याचा निर्णय घेतला पण वाटे वाढून मला हवे तेवढे पैसे मिळतील असे नाही त्यामुळे सद्यस्थितीत त्रास होतो आहे हे कळते.म्हणून
म्हणून आहे ते ठीक आहे.अजूनही वेळ गेलेली नाही असे समाधान करता येते, पण साध्या साध्या गोष्टीत राग, मोह टाळता येत नाही किंवा नियमनही जमत नाही, कठीण वाटते म्हणून इथे थोडे दिवस अजून बंधनात राहणे ठरवले आहे.
नमस्कार,
दारूचा मोह टाळता येत नाही आच तर आजाराचा भाग आहे तो आपल्याला स्वीकारणे भाग आहे, अपरिहार्य आहे पण तो मोह होईल हे स्वीकारून त्यापासून लांब राहणे हे जरुरी आहे.
वैशाली जोशी मॅडम
No comments:
Post a Comment