
कथा ही पहिल्या प्रीतीची, मनाच्या नवथर भीतीची,
कशी सांगू कुणा सांगू, व्यथा त्या अपुऱ्या भेटीची?
कथा ही पहिल्या प्रीतीची!
सैलसर वळणाच्या वाटा
मनातुनी सळसळल्या लाटा
उमटला अंगावर काटा
उगा भ्याले, मुकी झाले, विसरले बोली ओठीची
कथा ही पहिल्या प्रीतीची!
उगा का काळीज धडधडलं?
पाखरू उरात फडफडलं
कसं ग काहीच ना घडलं?
कशी बाई, खुळी मीही, हरवली दौलत गाठीची?
कथा ही पहिल्या प्रीतीची! जरा तो गालांतच हसला
हसला, पुन्हा नाही दिसला
भाबडा जीव माझा फसला
नको ते ते, मनी येते, अता मी रडते रातीची!
कथा ही पहिल्या प्रीतीची!
शान्ता ज.शेळके
संगीत:दशरथ पुजारी
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment