२३-१०-०९
आज रेणुताई गावसकर यांनी त्यांच्या संस्थेतील निगडीत कांही सत्यकथा सांगितल्या. शांतपणे ऐकल्या.त्याच काय पण या विषयावर मत मांडणे, गोष्टींचा शेवट करणे खरेतर माझ्या आवाक्याबाहेरचे काम आहे.कारण माझे अनुभवविश्व जरी लहान असले तरी, वस्तुस्थिती, समस्या, त्यांचे अनाकलनीय वागणे, त्यामागची करणे ही मी जवळून पाहिली आहेत कारण झोपडपट्टी, जुगार, स्टेशन, ही ती संलग्न ठिकाणे होत. तिथले वास्तव कांही वेगळेच सांगते त्यामुळे जरी कथेचा शेवट वगैरे करा असे जोशी सरांनी म्हंटले तरी वास्तव हे कटू असते एवढेच खरे!त्यांच्या कथा बाजूला ठेऊन मी माझ्याशी निगडीत मुद्दा कांही आहे का?ते पाहण्याचा प्रयत्न केला.
तसा पुन्हा पलायनवाद, सत्याला सामोरे न जाणे, म्हणजेच दारू पिणे हे लिहिण्यासाठी आदर्श आहे पण आता फक्त दारू सहन होत नाही, परिस्थिती अनुकूल नाही, म्हणून त्यापासून लांब राहणे म्हणजे उशिराचे शहाणपण आहे.
पण मुळात असे काय घडते कि मला तेथून पळून जाण्यासाठी दारू प्यावी वाटते? कारण खरेतर गेल्यावर्षी मला जे शारीरिक त्रास झाले, तेंव्हापासून पिण्याआधी सर्व चित्र नीट उभे असते.तरी मी पितो याचा अर्थ मी आनंद/राग व्यक्त करण्यासाठी फक्त दारूचाच आश्रय घेतला होता, आता ती सांगड तोडावी लागेल असे वाटते.कारण मागचे जे पिणे आहे २/३ दाचे , ते थोड्या अवधीसाठी असले तरी, स्लीप च्या वेळी बाह्य परिस्थिती वगैरे सर्व छान होते!
फक्त मी एकटा होतो.त्यामुळे समजा, एखादा चांगला चित्रपट पहायचा तर दारू, किंवा एखाद्या सध्या घटनेत राग आला तर तो न सांगता आधी दारू प्यायची, मग सांगायचे ही सांगड मला तोडता आली नाही हे खरे!
त्यामुळे मी मर्यादेत दारू पिऊ शकणार नाही एवढे 'सत्य' निदान माझ्यापुरते 'मान्य' तरी करणे मला भाग आहे हे पटते.
नमस्कार,
असोसिएशन ब्रेक करणे हे फार गरजेचे आहे.उदा: मजा कि दारू किंवा दु:ख कि दारू हे साखळी सारखे आहे.ही साखळी किंवा असोसिएशन ब्रेक करणे खूप गरजेचे आहे.तर आता पर्याय वेगळे हवेत.उदा: राग आला कि कौन्सिलरना फोन किंवा ए.ए.मिटिंग मजा कि फॅमिलित राहणे वगैरे.
मुख्य म्हणजे भूमिकेनुसार जबाबदारी असे लिहून काढू.
वैशाली जोशी मॅडम
No comments:
Post a Comment