Thursday 28 January 2010

06-11-2009

एकदा एखादी भावना, विशेषत: राग आला की तो कळतो, तो त्या त्या प्रसंगापुरता मर्यादित राहत नाही, त्याला मागचे कांही अनुभव जोडले जातात...तो तीव्र होतो.....तो व्यक्त करू नये हे कळते...चिडचिड होते...पुढे..एक विचार...पद्धतशीरपणे थोड्या प्रमाणात व्यक्त करून[तसे दाखवून] पण स्वतः थोडी चिडचिड वगळता अस्वस्थ न होता प्रसंग हाताळला तर त्याला नाटक तर म्हणू शकत नाही, की, दुसऱ्यांना सांगतो, 'त्यात काय एवढं?आणि स्वतः पहा केवढा चिडतो?'हे ऐकणे अपेक्षित असूनही ते करतो ..तेंव्हा याला काय म्हणावे?
असा एक छोटासा प्रसंग काळ घडला होता.[इथल्या तुलनेने मोठाच!] निमित्त होते कुत्रीने चप्पल पळविण्याचे, खूप शोधली , सापडली नाही.थोडा चिडलो, कुत्रीला एक लाथ मारली!वास्तविक इथे मी सारंग सरांना नवी चप्पल आणण्याविषयी सांगितले होते, शिवाय मला इथे कुणाकडे दोन जोड आहेत{माझ्या पायाचे,मापाचे}ते माहिती होते.एक दिवसासाठी त्याने नाहीही म्हणले नसते, इथे विषय संपला होता, संपण्यास हरकत नव्हती.पण कांही पूर्वग्रहांमुळे नंतर उगाच जसे कांही मला प्रचंड रागच आला आहे असे दर्शवित मी 'कुत्री मारूनच टाकीन' वगैरे बोलत बसलो.खरे पाहता राग किंवा संताप खरच मनात असता तर, वर्तनात displesment [विस्थापन] म्हणून इतर कुणावर राग किंवा कुणाशी गैर वागलो असतो...पण तसेही नाही..तसेही कांही केले नाही..कारण बाब साधी तरीही माझ्या दृष्टीने महत्वाची होती.
प्रसंग महत्वाचा नाही पण जी थोडी चिडचिड झाली त्यात विश्लेषण केले तर आढळले की मुळात मुद्दा चप्पलचा नव्हता तर..माझी पूर्वीपासूनची 'समस्या' मी मदत मागतं नाही!, का मागावी?..कुणी दिल्यास घेण्यास संकोच करतो.
यामागेही मी का मागावे? हा विचार प्रबळ ठरतो.समस्या काय? तर चप्पल कुत्रीने पळवली!मग समस्येचे मूळच नष्ट करा, कुत्रीच मारून टाका!म्हणजे लोकांकडे मागायला नको!
अर्थात हा अविवेकी विचार आहे हे मान्य आहे.पण मी माझ्या पूर्वायुष्यात [मी आजही कुत्र्यांना भितो हे खरे आहे.]केवळ कुत्रा अंगावर आला, भुंकला, म्हणून खरेच जीवानिशी मारूनही टाकले आहेत.पण आता हे बदलाने आवश्यक वाटते.
आदर्शवाद वगैरे गप्पा मारायला, बोलायला चांगला वाटतो पण माझ्यासारख्या सामान्य दारुड्याला या साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीतच टेन्शन येतं बुवा!
त्यामुळे आज जिथे कुत्री मारू वाटली, तिथे उद्या माणूस मारू म्हटले तरी कांही विशेष वाटणार नाही.कारण तेही पूर्वी सख्या आईपासून ते बाहेर सगळीकडे केलेच आहे.
तेंव्हा आतातरी reaction तात्काळ देत नाही हेच महत्वाचे.
response देईन तेंव्हा देईन!

नमस्कार,
एवढं awareness आहे तर reaction चा response नक्की होईल अशी मला आशा आहे.विचार करणं, वाचन करणं ह्या सगळ्यात तुम्ही अगदी तरबेज आहात, problem फक्त implementation [प्रत्यक्षात उतरवण्याबद्दल आहे]
तुम्ही जे त्या खेळाबद्दल लिहिले आहे, त्यात तुम्ही तुमचा awareness इतरांना दाखवत नाही हे खरे आहे पण तरीही मागे जाऊन विचार असा करा की, कुठेतरी न्यूनगंड नाही ना?
यापुढे काय करायचं ह्याबद्दल विचार केला आहात का?कांही प्लान आहे का?
वैशाली जोशी मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....