Thursday 14 January 2010

मर्म


कोकीळाही काळी आणि कावळाही काळा

दोघांच्यातील मुख्य फरक सांगतोस का बाळा?

बाळा म्हणाला,

कोकीळ पक्षी सुरेल गातो,

काळा कावळा कर्कश्य ओरडतो,

आजोबा म्हणाले,

अगदी बरोबर;

आता तू विचार मी देतो उत्तर

बाळा म्हणाला,

मग सगळ्याच का नाही कोकीळा?

कर्कश्य काळा कावळा हवाच कशाला

आजोबा पडले विचारात

कि आता कसे सांगणार?

माझ्याही श्राद्धाला कावळाच लागणार!


राजेश गोखले

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....