Thursday, 14 January 2010

भावना


मजला माझ्या सांग मना
कशारे सावरू तुझ्या भावना
परि काट्याच्या तीक्ष्ण कधी त्या,
कधी उन्मादी सागर लाटा
कापूस सावरी कधी कधी त्या
कधी घनघोर जंगल दाट
मोरपीस सावली कधी कधी त्या
झळा कधी त्या प्रखर उन्हाच्या
घनघोर पाऊसधारा कधी त्या
शीतलता असते कधी दवाची
कास धरोनी ज्ञानाची माझ्या
स्वामित्व त्यांचे झुगारू कारे?
पण खरे सांगता शिवाय त्यांच्या
अस्तित्वही माझे क्षणभंगुर आहे
राजेश गोखले

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....